शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

कष्टाचं फळ! 10व्या वर्षी हॉटेल क्लीनर, न्यूजपेपर वाटायचं काम केलं; अनाथाश्रमात वाढला, झाला IAS

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 12:42 IST

IAS officer B Abdul Nasar : आयएएस अधिकारी बी अब्दुल नासर यांनी वयाच्या पाचव्या वर्षी आपल्या वडिलांना गमावलं. त्यानंतर त्यांना अत्यंत संघर्षमय जीवन जगावे लागलं. 

प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. एका तरुणाने संघर्षमय प्रवास करत घवघवीत यश संपादन केलं आहे. बी अब्दुल नासर असं या व्यक्तीचं नाव असून त्यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळते. आयएएस अधिकारी बी अब्दुल नासर यांनी वयाच्या पाचव्या वर्षी आपल्या वडिलांना गमावलं. त्यानंतर त्यांना अत्यंत संघर्षमय जीवन जगावं लागलं. 

नासर यांची आई उदरनिर्वाह करण्यासाठी एका घरामध्ये काम करायची. तर ते आणि त्यांची भावंडं ही अनाथ आश्रमात राहिली. तब्बल 13 वर्षे केरळमधील एका अनाथ आश्रमात राहून शालेय शिक्षण पूर्ण केलं. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी हॉटेल क्लीनर आणि सप्लायर म्हणून काम केलं. ते काही वेळा त्यांच्या अनाथाश्रमातून पळून देखील गेले पण अभ्यास पूर्ण करण्यासाठी परत आले. 

अत्यंत गरिबी असूनही त्यांनी 12वी पूर्ण केली आणि नंतर थलासरी येथील सरकारी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. फोन ऑपरेटर आणि न्यूजपेपर डिलिव्हरी बॉय सारख्या नोकऱ्या केल्या. पदव्युत्तर शिक्षणानंतर, नासर 1994 मध्ये केरळ आरोग्य विभागाचे अधिकारी म्हणून सरकारी सेवेत रुजू झाले. त्यांनी 2006 मध्ये राज्य नागरी सेवेअंतर्गत उपजिल्हाधिकारी म्हणून काम केलं. 

2015 मध्ये नासर यांना केरळमधील सर्वोत्तम उपजिल्हाधिकारी म्हणून गौरविण्यात आले. 2017 मध्ये बी अब्दुल नासर यांना आयएएस अधिकारी पदावर बढती देण्यात आली. 2019 मध्ये कोल्लमचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त होण्यापूर्वी त्यांनी केरळ सरकारचे गृहनिर्माण आयुक्त म्हणून काम केलं आहे. त्यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी