शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

दिव्याच्या प्रकाशात केला अभ्यास; कोचिंगशिवाय IAS अधिकारी, घरीच केली UPSCची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 15:33 IST

मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अंशुमन राज यांनी दिव्याच्या प्रकाशात शिक्षण घेतलं. तसेच कोणत्याही कोचिंगशिवाय UPSC परीक्षा देऊन IAS झाले आहेत.

कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचं असेल तर काहीतरी करण्याची जिद्द आणि उत्साह असणं आवश्यक आहे. आयएएस अधिकारी अंशुमन राज यांच्यातही तेच गुण आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अंशुमन राज यांनी दिव्याच्या प्रकाशात शिक्षण घेतलं. तसेच कोणत्याही कोचिंगशिवाय UPSC परीक्षा देऊन IAS झाले आहेत. त्यांची यशोगाथा जाणून घेऊया...

IAS अधिकारी अंशुमन राज यांचा जन्म बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात झाला. गावातीलच जवाहर नवोदय विद्यालयातून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. दहावीपर्यंत दिव्याच्या प्रकाशात अभ्यास केला. यानंतरचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय रांची येथून केले.

अंशुमन राज यांनी इंटरमीडिएटनंतर इंजिनीअरिंगची पदवी घेतली. पण त्यांना नेहमीच यूपीएससी उत्तीर्ण करून आयएएस व्हायचे होते. शालेय जीवनापासूनच ते याबाबत स्पष्ट होते. म्हणूनच ग्रॅज्युएशननंतर ते यूपीएससीच्या तयारीत पूर्णपणे गुंतले होते..

अंशुमन यांनी यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी कोणतेही कोचिंग घेतले नाही. असे असूनही, त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि आयआरएस झाले. पण आयआरएस मिळाल्याने ते समाधानी नव्हते. त्यांनी आयएएसपेक्षा कमी काही स्वीकारले नाही. मात्र, यानंतर त्यांना पुन्हा यशासाठी अनेक अपयशांना सामोरे जावे लागले.

अंशुमन राज पहिल्याच प्रयत्नात आयआरएस झाले. मात्र त्यानंतर त्यांना सलग दोनदा अपयश आले. अखेर चौथ्या प्रयत्नात म्हणजेच 2019 मध्ये पुन्हा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्यात ते यशस्वी झाले. यावेळी ते ऑल इंडिया 107 वी रँक मिळवून आयएएस होण्यात यशस्वी झाले.

UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी गावात राहूनही करता येते, असा विश्वास आयएएस अंशुमन राज यांना वाटतो. यासाठी फक्त चांगल्या इंटरनेट कनेक्शनची गरज आहे. यासोबतच योग्य रणनीती आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचीही गरज आहे. त्यांचा विश्वास आहे की मर्यादित संसाधने असूनही, योग्य प्रकारे तयारी केल्यास, एखादी व्यक्ती यूपीएससी उत्तीर्ण करू शकते आणि आयएएस होऊ शकते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी