गुवाहाटी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आसामच्या दिब्रुगढ जिल्ह्यात ईशान्य भारतातील पहिल्या आपत्कालीन लॅण्डिंग सुविधेचा (इएलएफ) उपयोग करत सी-१३०जे विमानातून राष्ट्रीय महामार्ग-३७ वरील मोरन येथे शनिवारी उतरले. अशी कामगिरी करणारे ते पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ईशान्येला आपत्कालीन लॅण्डिंग सुविधा मिळणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. नैसर्गिक आपत्ती, अन्य संकट काळात ही सुविधा अत्यंत महत्त्वाची आहे.
पीएम-ईबस सेवेअंतर्गत २२५ इलेक्ट्रिक बसपैकी नागपूरला ५० बस : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम-ई बस सेवा योजनेअंतर्गत २२५ इलेक्ट्रिक बसेसना शनिवारी हिरवा झेंडा दाखवला. यापैकी गुवाहाटीला १००, महाराष्ट्रातील नागपूरला ५०, गुजरातमधील भावनगरला ५० तर पंजाबमधील चंडीगडला २५ बस देण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांना उत्तम सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होईल.
लॅण्डिंगची वैशिष्ट्ये काय?
विमानाचा प्रकार : लॉकहीड मार्टिन - सी-१३०जे सुपर हर्क्युलस
उड्डाण प्रारंभ कुठून? : चाबुआ हवाई दलाचे केंद्रातून प्रवास सुरू
कुठे केले इमर्जन्सी लॅण्डिंग? : राष्ट्रीय महामार्ग-३७वरील ४.२ किमी मजबूत धावपट्टीवर आपत्कालीन लॅण्डिंग
प्रकल्पाचा खर्च : १०० कोटी रुपये
धोरणात्मक पाऊल : १९६२च्या चीन-भारत युद्धाच्या पार्श्वभूमीवर ईशान्य सीमेच्या सुरक्षेसाठी खास केली बांधणी
भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांची, तसेच आपत्ती निवारणासाठी वापरल्या जाणाऱ्या हेलिकॉप्टरची २० मिनिटांची हवाई प्रात्यक्षिके पंतप्रधानांनी यावेळी पाहिली.
Web Summary : PM Modi inaugurated Northeast India's first emergency landing facility on a highway in Assam. He witnessed air displays. Nagpur received 50 electric buses under the PM-eBus Sewa scheme. This strategic move enhances border security after the 1962 war.
Web Summary : पीएम मोदी ने असम में राजमार्ग पर पूर्वोत्तर भारत की पहली आपातकालीन लैंडिंग सुविधा का उद्घाटन किया। उन्होंने हवाई प्रदर्शन देखे। पीएम-ईबस सेवा योजना के तहत नागपुर को 50 इलेक्ट्रिक बसें मिलीं। यह रणनीतिक कदम 1962 के युद्ध के बाद सीमा सुरक्षा को बढ़ाता है।