शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - IAF ची भन्नाट कामगिरी! IL-78 मधून हवेतच अवॉक्समध्ये भरले इंधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 18:01 IST

एमब्रार एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम या विमानात आयएल-78 या टँकर विमानातून हवेतच इंधन भरण्याचा केलेला  प्रयोग यशस्वी ठरला.

ठळक मुद्देविमान हवेत असताना एका विमानातून दुस-या विमानात इंधन भरणे सोपे नसते. इंधन भरताना दोन्ही विमानांची उंची, पातळी आणि उड्डाणामध्ये अचूकता लागते.

नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाने बुधवारी आणखी एक कठीण प्रयोग यशस्वी करुन दाखवला. विमान उड्डाणावस्थेत असताना एमब्रार एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम या विमानात आयएल-78 या टँकर विमानातून हवेतच इंधन भरण्याचा केलेला  प्रयोग यशस्वी ठरला. एमब्रार एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम (अवॉक्स) हे टेहळणी विमान असनू या  विमानाला भारताचे आकाशातील नेत्र म्हटले जाते. या विमानात आता हवेतच इंधन भरणे शक्य असल्यामुळे टेहळणी क्षमतेमध्ये कैकपटीने वाढ होणार आहे. 

विमान हवेत असताना एका विमानातून दुस-या विमानात इंधन भरणे सोपे नसते. त्यासाठी वैमानिकाला कौशल्य आणि अनुभवाची गरज लागते. इंधन भरताना दोन्ही विमानांची उंची, पातळी आणि उड्डाणामध्ये अचूकता लागते. हवेतल्या हवेत रिफ्युलिंग म्हणजे इंधन भरण्याला फक्त दहा मिनिट लागतात पण त्यामुळे अवॉक्स आणखी चार तास उड्डाण करु शकते. 

ब्राझिलियन एमब्रार जेटवर बसवलेली एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केली आहे. भारतीय अवॉक्स प्रणाली बसवण्यासाठी ब्राझिलियन एमब्रार जेटमध्ये काही बदल करण्यात आले. यावर्षाच्या सुरुवातील या विमानाचा भारतीय हवाई दलात समावेश करण्यात आला. हवाई युद्धात ही प्रणाली गेमचेंजर ठरेल. मागच्या आठवडयात भारताने सुखोई विमानातून ब्राम्होस क्षेपणास्त्र डागून नवीन इतिहास रचला होता. 

 

सुखोई फायटर जेटमधून सुपरसॉनिक ब्राह्मोस चाचणी भारताच्या सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्राची सुखोई-30एमकेआय फायटर जेट विमानातून घेण्यात आलेली चाचणी यशस्वी ठरली. आवाजाच्या वेगापेक्षा सुमारे तिप्पट वेगाने हल्ला करण्याची क्षमता ब्राह्मोसमध्ये आहे. सुखोई-30एमकेआय हे भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील अत्याधुनिक लढाऊ विमान आहे. ब्राह्मोसची सुखोईवरुन घेण्यात आलेली चाचणी यशस्वी ठरल्यामुळे भारतीय हवाई दलाची शत्रू प्रदेशात खोलवर हल्ला करण्याची क्षमता वाढणार आहे.

ब्राह्मोस हे वर्ल्डक्लास क्षेपणास्त्र आहे. भारताकडे आता जमीन, समुद्र आणि हवेतून हे क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता प्राप्त झाली आहे. अचूकता आणि वेग हे ब्राह्मोसचे वैशिष्टय आहे. सुखोईमधून ब्राह्मोस डागल्यानंतर या क्षेपणास्त्राने बंगालच्या सागरातील आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला. ब्राह्मोस आणि सुखोई हे कॉम्बिनेशन सर्वात खतरनाक असून शत्रू सैन्यासाठी धोक्याची घंटा आहे.    

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दल