शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
2
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
3
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
4
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
5
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
6
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
7
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
8
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
9
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
10
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
11
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
12
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
13
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
14
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले
15
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
16
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
17
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
18
प्रबोधिनी एकादशी २०२५: देवउठनी एकादशीला विष्णू खरोखरच ४ महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात का?
19
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
20
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?

जैशचे 8 ते 10 दहशतवादी आत्मघाती हल्ल्याच्या तयारीत, सीमारेषेवरील हवाईतळांवर ऑरेंज अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 11:23 IST

पाकिस्तानच्या सीमेलगतच्या भागात असलेल्या हवाई तळांवर जैश ए मोहम्मदचे 8 ते 10 दहशतवादी आत्मघाती हल्ल्याच्या तयारीत असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.

नवी दिल्ली -  पाकिस्तानच्या सीमेलगतच्या भागात असलेल्या हवाई तळांवर जैश ए मोहम्मदचे 8 ते 10 दहशतवादी आत्मघाती हल्ल्याच्या तयारीत असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. दरम्यान, या माहितीनंतर भारतीय हवाई दलाच्या  श्रीनगर, अवंतीपोरा, जम्मू, पठाणकोट, हिंडनसह सर्व मुख्य हवाई तळांवर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी अधिकाऱ्यांना सुरक्षा व्यवस्थेची समीक्षा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.   जैश ए मोहम्मदचे आठ ते 10 दहशतवादी जम्मू काश्मीरमधील हवाई तळांवर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे, अशी माहिती सरकारमधील उच्चपदस्थ सुत्रांनी दिली. 

गुप्तचर यंत्रणांच्या इसाऱ्यानंतर हवाई दलाच्या श्रीनगर, अवंतीपोरा, जम्मू, पठाणकोट, हिंडन हवाईतळांसर सर्व मुख्य हवाई तळांवर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच अधिकाऱ्यांना हवाई तळावरील सुरक्षाव्यवस्थेची समीक्षा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.   

  दरम्यान, कलम 370 हटवण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित डोवाल यांच्यावर हल्ला करण्यासाठी जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटना दहशतवाद्यांचे एक विशेष पथक पाठवण्याची तयारी जैशने केली आहे. तसेच आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेचा एक मेजर या हल्ल्याच्या तयारीसाठी जैशला मदत करत, असल्याचे गुप्तहेर संघटनांतील सूत्रांनी दिलेल्या माहितीममधून समोर आले आहे. एका परदेशी गुप्तहेर संघटनेला जैश ए मोहम्मद या पाकिस्तानी दहशतावादी संघटनेचा दहशतवादी शमशेर वाणी आणि त्याच्या म्होरक्या यांच्यात झालेल्या संभाषणाची गुप्त माहिती एका  परदेशी दहशतवादी संघटनेला मिळाली. त्यानंतर या गुप्तहेर संघटनेने ही माहिती भारताच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना दिली. 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मद