शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

"सरेंडर करणार नाही, मग मृत्यू का येईना...!"; इराण युद्धावर शिया धर्मगुरू मौलाना सय्यद कल्बे जवाद नकवी यांचा आक्रमक पवित्रा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 21:06 IST

"सरकारने परवानगी दिली तर येथील हजारो लोक इराणमध्ये जाऊन लढण्यास तयार आहेत, परंतु आम्ही कायद्याचे पालन करतो आणि तो मोडू इच्छित नाही," असेही मौलाना नकवी यांनी म्हटले आहे.

"इराणसोबत कोणताही चर्चा नाही," असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केल्यानंतर, आता शिया धर्मगुरु मौलाना सय्यद कल्बे जवाद नकवी यांनीही थेटच प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "करबलावर विश्वास असणारे कधी सरेंडर करत नाहीत. मग मृत्यू का येईना! इराण कोणत्याही परिस्थितीत आत्मसमर्पण करणार नाही. इराण जगासमोर एकटा उभा आहे, असे म्हणत आमची ट्रम्प यांच्याशी बोलण्याची इच्छा नाही." 

ते पुढे म्हणाले, "ट्रम्प यांनी दावा केला की सर्वोच्च नेत्याच्या मृत्युनंतर लोक सर्व ताब्यात घेतील, पण असे घडले का? यावरून सर्वांनी खमेनींना पाठिंबा दिल्याचे सिद्ध होते. त्यांनी माफियांसमोर झुकण्यास नकार दिला. इराण कधीही शरणागती पत्करणार नाही." दरम्यान, सरकारने परवानगी दिली तर येथील हजारो लोक इराणमध्ये जाऊन लढण्यास तयार आहेत, परंतु आम्ही कायद्याचे पालन करतो आणि तो मोडू इच्छित नाही," असेही मौलाना नकवी यांनी म्हटले आहे.

अब्दुल मजीद हकीम इलाही यांची प्रतिक्रियाइराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचे दिल्लीतील प्रतिनिधी डॉ. अब्दुल मजीद हकीम इलाही यांनीही अमेरिकेच्या हल्ल्यांचा निषेध केला. ते म्हणाले, "ही परिस्थिती कुणालाही नको होती. आपली स्थिती चांगली नाही, अमेरिकेने आमच्यावर हल्ला केला आहे. आमच्या प्रतिष्ठेसाठी, नैतिकतेसाठी आणि स्वातंत्र्यासाठी आम्हाला स्वतःचे संरक्षण करावे लागेल. त्यांनी बलिदानासंदर्भात भाष्य केले आणि इराणचे भविष्य चांगले असेल असा विश्वासही व्यक्त केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran will not surrender, even if death comes: Shia cleric

Web Summary : Shia cleric Maulana Kalbe Javad Naqvi asserts Iran won't surrender, echoing sentiments against US aggression. He dismisses Trump's claims, emphasizing support for Khamenei. An Iranian representative in Delhi condemned the attacks, vowing to defend Iran's dignity and independence. Thousands are ready to fight if permitted.
टॅग्स :IranइराणWarयुद्धDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका