शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

गरीब, वंचितांचे प्रतिबिंब माझ्यात दिसेल, राष्ट्रपती मुर्मू यांचे उद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 05:45 IST

द्रौपदी मुर्मू यांचे उद्गार; युवक, महिलांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशातील वंचित, गरीब, दलित, आदिवासींना माझ्यामध्ये त्यांचे प्रतिबिंब दिसू शकेल आणि ही मला अतिशय समाधान देणारी बाब आहे. देशातील युवक, महिलांच्या हिताला राष्ट्रपती या नात्याने मी सर्वोच्च प्राधान्य देणार आहे. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ निर्माण करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. विद्यमान स्थितीत भारत प्रत्येक क्षेत्रात विकासाचा नवा अध्याय लिहीत आहे, असे उद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या पहिल्या भाषणात काढले. १५व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील सेनानींना आपल्या भाषणात वंदन केले. त्या म्हणाल्या की, स्वातंत्र्यसेनानींच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी देशाने आता ‘सबका प्रयास’ व ‘सबका कर्तव्य’ या दोन गोष्टींचा अंगीकार करीत वेगाने पुढे गेले पाहिजे. द्रौपदी मुर्मू या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्माला आलेल्या पहिल्या राष्ट्रपती आहेत. त्यांनी आपल्या भाषणात या गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृतमहोत्सव सुरू असतानाच्या काळात राष्ट्रपतिपदी निवड झाली हे माझे भाग्य आहे.

‘हे’ तर भारतीय लोकशाहीचे सामर्थ्यn द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले की, मी एका लहान आदिवासी खेड्यात वाढले. तिथे प्राथमिक शिक्षण मिळणे हेसुद्धा स्वप्नवत होते. n महाविद्यालयीन शिक्षण घेणारी मी त्या खेड्यातील पहिली व्यक्ती होते. n अशी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची राष्ट्रपतिपदी निवड होणे हे भारतीय लोकशाहीच्या सामर्थ्यामुळेच शक्य झाले. n अशा प्रगतिशील देशाचे नेतृत्व करायला मिळाले याचा मला अभिमान वाटतो.

नव्या राष्ट्रपतींचा आहार काय?द्रौपदी मुर्मू या शाकाहारी आहेत. सकाळी नाश्त्यासाठी जे काही घरी तयार केले जाते ते त्या खातात. काही ड्रायफ्रूट्स त्याच्या नाश्त्यात असतात. दुपारी भात, भाजी, रोटी त्या खातात. रात्री एखादे फळ आणि हळद दूध घेतात. मुर्मू या अतिशय छान स्वयंपाक करतात, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. द्रौपदी या वाचन आणि लेखनात चांगल्या, तितक्याच त्या स्पष्टवक्ताही होती. मुलींमध्ये भांडण झाले की त्या स्वत:च सोडवण्यासाठी यायच्या, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

द्रौपदी मुर्मू यांचा जीवनपट

१९५८२० जून रोजी ओडिशातील मयूरगंज येथे जन्म१९७९-८३ जलसिंचन, विद्युतपुरवठा विभागात ज्युनिअर असिस्टंट म्हणून कार्यरत१९९४-९७ ऑनररी अस्टिस्टंट टीचर म्हणून काम१९९७पहिल्यांदा निवडणूक लढवून लोकप्रतिनिधी बनल्या.२०००विधानसभा निवडणुकीत विजयी, राज्यमंत्रिपदाची मिळाली जबाबदारी२००६भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष बनल्या.२००९रायरंगपूर येथून दुसऱ्यांदा आमदार२०१५ झारखंडच्या राज्यपालपदी निवड२०२२देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती

 

टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मूPresidentराष्ट्राध्यक्ष