शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा हजारेंच्या आंदोलनाला लांबूनच शुभेच्छा; राजू शेट्टींनी सांगितलं दुराव्याचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 13:01 IST

अनेकदा विनंती करूनही अण्णा हजारे शेतकऱ्यांच्या पदयात्रेत सहभागी झाले नव्हते.

नवी दिल्ली: शेतकऱ्यांसाठी राक्षसांनी, भूतांनी आंदोलन केले तरी आमचा त्याला पाठिंबा असेल. याच न्यायाने अण्णा हजारेंच्या रामलीला मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनालाही माझा पाठिंबा आहे. परंतु, मी या आंदोलनात सहभागी होणार नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी सांगितले. ते मंगळवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी अण्णांच्या आंदोलनात सहभागी होण्यास नापसंती दर्शविली. यापूर्वी आम्ही शेतकऱ्यांच्या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी अण्णा हजारे यांना विनंती केली होती. रस्त्यात कुठेही थोड्यावेळासाठी तुम्ही शेतकऱ्यांना भेटलात तर त्यांचा उत्साह दुणावेल, असे आम्ही त्यांना सांगितले होते. मात्र, अनेकदा विनंती करूनही अण्णांनी त्याकडे दुर्लक्ष केले, अशी खंत यावेळी राजू शेट्टी यांनी बोलून दाखविली. याशिवाय, लोकप्रतिनिधी असल्यामुळे मी अण्णांच्यादृष्टीने अस्पृश्य आहे. त्यामुळे आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन मला स्वत:चा अपमान करून घ्यायचा नाही. तसेच अण्णांच्या या आंदोलनाचे नियोजन करणाऱ्या काही व्यक्तींची पार्श्वभूमीही संशयास्पद आहे. त्यामुळे आम्ही या आंदोलनापासून चार हात लांब राहणेच पसंत केले आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अगदी राक्षसांनी, भूतांनी आंदोलन केले तरी आमचा त्याला पाठिंबा आहे. फक्त त्यांचा हेतू सच्चा हवा, असे राजू शेट्टी यांनी म्हटले. मी अण्णांच्या आंदोलनात सहभागी होणार नसलो तरी दिल्लीत ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा मी संसदेत मांडत असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले. २३ मार्चपासून अण्णा हजारे यांनी लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिल्लीच्या रामलीला मैदानात उपोषण सुरु केले आहे. दिल्लीत गेल्यावेळी मिळालेला तेवढा प्रतिसाद मिळत नसला तरी दिल्लीचा ऊन्हाळा सुरु झाला आहे. वाढत्या तापमानात अण्णांची प्रकृती जास्तच खालावली तर जनप्रक्षोभ उसळण्याची भीती आहे. त्यामुळे भाजपाच्या केंद्रीय नेत्यांनी उपोषणाला गंभीरतेने घेतले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरीश महाजनांच्या माध्यमातून त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न करत आहेत. मात्र अण्णांनी अजूनपर्यंत त्याला दाद दिलेली नाही.  

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेRaju Shettyराजू शेट्टी