शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिरासाठी जागा, सोन्याची वीट देईन; मुघल राजघराण्याच्या शेवटच्या वंशजाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 04:35 IST

अयोध्या वादावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत सहभागी होण्यासाठीही तुकी यांनी अर्ज केला आहे.

हैदराबाद : अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशिदीची वादग्रस्त जागा आम्हाला दिली तर आम्ही तेथे श्री रामाचे मंदिर बांधण्यासाठी सोन्याची वीट देऊ, अशी तयारी हैदराबादमध्ये राहणाऱ्या मुघल राजघराण्याच्या शेवटच्या वंशजाने दर्शविली आहे.दिल्लीचे शेवटचे मुघल बादशहा बहादूर शाह जफर यांचे सहाव्या पिढीतील ५० वर्षांचे वंशज हबिबुद्दीन तुकी म्हणाले की, अयोध्येतील सर्व वादग्रस्त जमीन मी राम मंदिर बांधण्यासाठी परत देईन व शिवाय मंदिरासाठी सोन्याची वीटही देईन. तुकी यांनी असाच प्रस्ताव गेल्या सप्टेंबरमध्येही केला होता.अयोध्या वादावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत सहभागी होण्यासाठीही तुकी यांनी अर्ज केला आहे. मात्र, न्यायालयाने अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही. तुकी म्हणाले की, न्यायालयापुढे असलेल्या कोणाही पक्षकाराकडे अयोध्येतील त्या जागेच्या मालकीची कागदपत्रे नाहीत; पण मुघल शासकांचा वंशज या नात्याने ती जमीन कोणाला दिली जावी याविषयी मत व्यक्त करण्याचा हक्क तरी मला नक्कीच आहे.वादग्रस्त जागेवर हक्क दाखविणारे दस्तावेज आपल्यापाशीही नाहीत, हे मान्य करून तुकी म्हणाले की, पण मुघल शासकांचा वंशजया नात्याने माझ्या हक्काच्यादाव्याला निदान विश्वासार्हता तरी आहे. दरवर्षी आग्रा येथे शहाजहाँ बादशहाचा उरूस भरतो तेव्हा ताजमहालाच्या कोठीचे दरवाजे मीच उघडतो यावरून मी मुघलांचा मान्यताप्राप्त वंशज असल्याचेच सिद्ध होते, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)भावनांचा आदर करायला हवातुकी यांच्या म्हणण्यानुसार पहिला मुघल बादशहा बाबर याने सन १५२९ मध्ये सैनिकांना नमाज पढण्याची सोय व्हावी यासाठी अयोध्येत ही मशीद बांधली. ती मशीद फक्त सैन्यासाठी होती व तेथे अन्य कोणीही जाऊ शकत नसे. ते म्हणाले की, मशीद बांधण्यापूर्वी त्या जागेवर नेमके काय होते, या वादात मला पडायचे नाही; पण ती जागा हे श्री रामाचे जन्मस्थान असल्याचे सांगून समाजाचा एक वर्ग त्यावर दावा करीत असल्याने मला त्यांच्या भावनांचा आदर करायला हवा.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर