शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रमाणपत्र मिळविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू; दिवाकर रावतेंचा अजब पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 06:24 IST

गडकरी यांच्या कारचा नंबर देऊन महाराष्ट्रातून पीयूसी मिळविण्याची हिंमतच कशी झाली?

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री असलेल्या नितीन गडकरी यांच्या कारचा नंबर देऊन महाराष्ट्रातून पीयूसी मिळविण्याची हिंमतच कशी झाली? असे सांगत, प्रमाणपत्र मागणा-या व्यक्तींवर कारवाई करा, असा उफराटा आदेश महाराष्ट्राचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी दिला. पीयूसीचा भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्यांवरच कारवाई करण्याची सरकारची भूमिका आश्चर्यकारक आहे.‘लोकमत’ने केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या कारचे पुणे, नागपूर आणि चंद्रपूर येथून पीयूसी प्रमाणपत्र मिळविले. गडकरी प्रदूषणाबाबत जागरूक आहेत, परंतु महाराष्ट्रात प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र देणारी केंद्रेच नियम पाळत नाहीत.वाहन न तपासताच प्रमाणपत्र दिले जात असल्याचे ‘लोकमत’ने उघड केले. रावते यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रात बोगस प्रमाणपत्रे दिली जातात, यापेक्षा रावते अस्वस्थ झाले, मंत्र्यांच्या कारचा नंबर देऊन पीयूसी मिळविल्याबाबत. त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ज्या पीयूसी केंद्रांकडून प्रमाणपत्र जारी झाली, त्यांच्यावर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत, परंतु केंद्रीय मंत्र्यांच्या कारचा नंबर देऊन प्रमाणपत्र मागण्याचे धाडस करणाºयांवरही गुन्हा नोंदविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तुमची यंत्रणा सदोष आहे, असे वाटत नाही? असे विचारता ते म्हणाले की, ते आम्ही तपासून घेऊ. काही सेंटर्सनी कार न तपासता प्रमाणपत्र दिले, याचा अर्थ संपूर्ण राज्यात असेच होते, असे म्हणता येणार नाही.>पुणे, चंद्रपूर येथे कारवाई!पुणे आणि चंद्रपूर येथून ज्या केंद्रांनी पीयूसी प्रमाणपत्र जारी केली, ती केंद्रे परिवहन विभागाने सील केली आहेत, तसेच नागपूर येथेही छापे पडले आहेत.

टॅग्स :Diwakar Raoteदिवाकर रावतेNitin Gadkariनितीन गडकरी