मागील काही दिवसांपासून हिंदी सक्तीवरुन राज्यात वाद सुरू आहे. काल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मीरा-भाईंदर मध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत ठाकरेंनी नगरसेवक, आमदार, खासदार आपलेच निवडून आणायचे. अमराठी मतदारसंघ बनवून हा सगळा भूभाग गुजरातला मिळवायचा हा यांचा डाव आहे. हिंदुत्वाच्या बुरख्याआडून मराठी संपवण्याचे राजकारण सुरू असल्याचे सांगितले. तसेच यावेळी त्यांनी भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. दरम्यान, आता या टीकेला दुबे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.
काही दिवसांपासून राज ठाकरे आणि निशिकांत दुबे यांच्यामध्ये मराठी आणि हिंदी भाषेवरुन टीका सुरू आहेत. दुबे यांच्या 'पटक-पटकर मारेंगे' या विधानाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की ते 'डुबो डुबोकर' मारेंगे. आता निशिकांत दुबे यांनी राज ठाकरेंना हिंदी शिकवल्याचे सांगून प्रत्युत्तर दिले.
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर
काही दिवसापूर्वी मराठी भाषेबाबत मीरा भाईंदर येथे एका दुकानदाराला झालेल्या मारहाणीवरून संताप व्यक्त झाल्यानंतर, दुबे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत कथितपणे म्हटले होते की, 'आम्ही तुम्हाला'पटक-पटकर मारेंगे'.' त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण झाला. ते म्हणाले होते की,'मुंबईत हिंदी भाषिकांना मारहाण करणाऱ्यांमध्ये हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारण्याचा प्रयत्न करा, तमिळ आणि तेलगू लोकांना मारण्याचा प्रयत्न करा.'
दुबेंचे प्रत्युत्तर
शुक्रवारी रात्री एका जाहीर सभेत राज ठाकरेंनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांना प्रत्युत्तर दिले. त्यांना मुंबईत येण्याचे आव्हान दिले. निशिकांत दुबे यांच्या विधानाचा संदर्भ देत राज ठाकरे म्हणाले, 'भाजपच्या एका खासदाराने सांगितले की आम्ही येथे मराठी लोकांना मारहाण करू. दुबे, तू मुंबईत ये. आम्ही तुला मुंबईच्या समुद्रात बुडवून मारू.' राज ठाकरे यांनी हे शब्द हिंदीत सांगितले.
आता यावर निशिकांत दुबे यांनी टीका केली. त्यांनी राज ठाकरेंचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आणि लिहिले की, 'मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली का?, असा सवाल दुबेंनी केला आहे.