शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

'तुझ्यासमोर मरायला आनंद होईल', प्रेयसीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलतानाच त्याने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 12:52 IST

प्रेयसीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलतानाच केली आत्महत्या

नवी दिल्ली - प्रेम प्रत्येकाच्या आयुष्यात एक नवी दिशा मिळते...पण कोणतीच गोष्ट अतीप्रमाणात नसायला हवी. तसेच प्रेमाचही आहे. हैदराबादमध्ये एका प्रियकरानं प्रेयसीसोबत बोलताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हैदराबादमधील सायबराबाद परिसरातील ही घटना आहे. 20 वर्षीय आयटीआयचा विद्यार्थी अजमीरा सागर आपल्या प्रेयसीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत होता. त्याचवेळी त्याने व्हिडीओ कॉलवर असलेल्या प्रेयसीसमोर गळफास घेतला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मृत तरुण त्याच्या बहिणीसोबत राहत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

2 मिनिटं 4 सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोन मुली तरुणाशी बोलताना दिसत आहेत. तो खुर्चीवर उभं राहून गळफास घेताना दोघीही त्याला पाहत होत्या. सुरुवातीला हा प्रँक असल्याचं दोघींनाही वाटलं. पण नंतर एकीला ओरडण्याचा आवाज आला. तरुणाच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. 

काय आहे प्रकरण - 

तुझ्यासमोर मरायला मला आनंद होईल, असा मेसेज तरुणाने बुधवारी सकाळी प्रेयसीला केला होता. त्यानंतर त्याने व्हॉट्सअॅपवरुन व्हिडीओ कॉल केला आणि चॅटिंग सुरु असतानाच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेच्या वेळी तरुण घरात एकटाच होता. यानंतर कुटुंबीय आणि घरमालकाने त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहिला. गळफास लावण्यासाठी त्याने बहिणीच्या साडीचा वापर केला होता, असंही पोलिसांनी सांगितलं.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. तपासादरम्यान त्याच्या मोबाईलमध्ये आत्महत्येचा व्हिडीओही पोलिसांना सापडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी कलम 174 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.