शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

'मी रस्त्यावर चहा पीत होतो, पोलिसांनी मला जबरदस्ती उचलले', रडत-रडत व्यक्तीने ऐकवली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 13:06 IST

Congress protest against ED: राहुल गांधींची EDकडून चौकशी सुरू आहे. यादरम्यान काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर निदर्शने करत आहेत. यावेळी पोलिसांनी एका व्यक्तीला जबरदस्ती उचलल्याचा दावा केला जात आहे.

नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ed) चौकशीला सामोरे जात आहेत. सोमवारनंतर आजही ईडीचे अधिकारी राहुल गांधींची चौकशी करत आहेत. तपास यंत्रणेची ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगत काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते दिल्लीच्या रस्त्यावर निदर्शने करत आहेत. यादरम्यान पोलिसांच्या गाडीत एक व्यक्ती रडताना दिसला.

राहुल गांधी ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी दिल्लीतील अकबर रोडवरील काँग्रेस मुख्यालयात पोहोचले होते. परिसरात त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात जमले होते. अकबर रोडच्या आजूबाजूच्या अनेक रस्त्यांवरही काँग्रेस कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी त्यांच्याकडून राहुल गांधींच्या समर्थनार्थ घोषणा सुरू होत्या. यावळी पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतले.

'माझा निदर्शनाशी संबंध नाही'यावेळी मानसिंग रोडवर पोलिसांच्या गाडीत एक व्यक्ती रडताना दिसला. हा माणूस रडत रडत म्हणाला, "मी एक सामान्य नोकरी करणारा व्यक्ती आहे. मी एका कंपनीत मार्केटिंगची नोकरी करतो. मी इथे चहा पीत होतो आणि पोलिसांनी मला उचलले. कॅमेऱ्यावर रडत रडत या व्यक्तीने सांगितले की, माझा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही." त्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून कारमध्ये बसलेल्या काँग्रेस नेत्याने पोलिसांवर जबरदस्ती केल्याचा आरोप केला.

राहुल गांधी यांची चौकशी सुरूनॅशनल हेराल्ड वृत्तपत्राप्रकरणी राहुल गांधी यांची चौकशी सुरू आहे. हे प्रकरण मनी लाँड्रिंगशी संबंधित आहे. या प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही ईडीने समन्स बजावले आहे, मात्र त्या सध्या रुग्णालयात आहेत, त्यामुळे त्यांची नंतर चौकशी होण्याची शक्यता आहे. मात्र ईडीच्या या कारवाईला काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. दिल्लीपासून जयपूरपर्यंत देशातील विविध शहरांमध्ये काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNew Delhiनवी दिल्ली