Asaduddin Owaisi on waqf bill News: संयुक्त संसदीय समितीकडून मंजूर होऊन आलेले वक्फ सुधारणा विधेयक चालू अधिवेशनातच संसदेत मांडले जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबद्दल माहिती दिली. पण, विधेयकाला काही विरोध पक्षांचा विरोध होत आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी यावरून मुख्यमंत्री नितीश कुमार आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना इशारा दिला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वक्फ सुधारणा विधेयक मुस्लिमांवर थेट हल्ला आहे, असा आरोप ओवेसींनी केला आहे. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले तर जिल्हाधिकाऱ्याला अधिकार मिळतील की, कोणतीही जमीन वक्फ बोर्डाची मानण्यास नकार देऊ शकतात. यामुळे त्या मालमत्तांवरील मुस्लिमांचा दावा संपुष्टात येईल.
हेही वाचा >>"आपल्याला कुर्बानी देण्यासाठी तयार राहावं लागेल’’, वक्फ विधेयकावरून महमूद मदनींचं आवाहन
मोदी चार कुबड्यांवर पंतप्रधान -ओवेसी
असदुद्दीन ओवेसी म्हणाले, "भाजपला लोकसभेत बहुमत नाहीये. हे सरकार कुबड्यांवर उभे आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत, कारण नितीश कुमार चंद्राबाबू नायडू, चिराग पासवान आणि जयंत चौधरी यांच्यावर कुबड्यांवर अवलंबून आहेत."
तुम्हाला मुस्लीम कधीच माफ करणार नाहीत, ओवेसींचा इशारा
"जर या चार पक्षांनी घटनाबाह्य विधेयकाला समर्थन दिले नाही, तर हे विधेयक कायद्यात रुपांतरित होऊ शकणार नाही. पण, जर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला, तर मी त्यांना सावध करतोय आणि इशारा देतोय की, मुस्लीम तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत.
"तुम्ही जर घटनाबाह्य विधेयकाला समर्थन दिले, जे मुस्लीम वक्फ बोर्ड कायमचे उद्ध्वस्त करणार आहे. ते मशिदी, दर्गे घेऊन टाकणार आहे. ते विधेयक कलम १४, कलम २५, कलम २६ आणि २९ चे उल्लंघन काय आहे", असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले.