उत्तर प्रदेशातील अलीगडमधील ज्या सासू-जावयाच्या प्रेमप्रकरणाने १० महिन्यांपूर्वी संपूर्ण देशात खळबळ माजवली होती, या कहाणीत आता एक असे धक्कादायक वळण आले आहे की ऐकणाऱ्यांचेही डोळे विस्फारतील. ज्या सासूसाठी जावयाने आपले घरदार सोडले, समाज सोडला, तीच सासू आता जावयाला चूना लावून पळून गेली आहे. आता हा जावई राहुल भरचौकात रडत असून पोलिसांकडे न्यायाची याचना करत आहे.
नेमकं प्रकरण काय?
१० महिन्यांपूर्वी राहुल नावाच्या तरुणाचे लग्न अनीता नावाच्या महिलेच्या मुलीशी ठरले होते. मात्र, लग्नाच्या १० दिवस आधीच नवरदेव आपल्या होणाऱ्या सासूला घेऊन फरार झाला. नंतर पोलिसांनी त्यांना शोधले, तेव्हा दोघांनीही "आम्ही एकमेकांवर प्रेम करतो आणि सोबतच राहणार," असे ठामपणे सांगितले होते. त्यानंतर हे दोघेही बिहारमधील सीतामढी येथे पती-पत्नीसारखे राहू लागले.
नवा ट्विस्ट: सासू फरार!
राहुलच्या दाव्यानुसार, ६ फेब्रुवारी रोजी तो नेहमीप्रमाणे कामासाठी घराबाहेर पडला. तो गेल्याच्या अवघ्या अर्ध्या तासानंतर सासू अनीता ही दुसऱ्यासोबत पळून गेली. जाताना तिने घरातील २ लाख रुपयांची रोकड, सोन्याचे मंगळसूत्र आणि दोन अंगठ्या असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला.
माझ्यावर वशीकरण केलं होतं!
एसएसपी कार्यालयात पोहोचलेल्या राहुलने आता अंधश्रद्धेचा आधार घेत खळबळजनक आरोप केला आहे. राहुल म्हणाला, "अनीताने मला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी तंत्र-मंत्र आणि जादूटोण्याचा वापर केला होता. तिने मला बळजबरीने ताईत बांधायला लावले होते आणि मला वश करून ठेवले होते. माझी बुद्धी अशी फिरली होती की मला तिच्याशिवाय दुसरं कुणी दिसत नव्हतं. पण आज तिनेच माझी फसवणूक केली."
सासूचे जावयावरही गंभीर आरोप
दुसरीकडे, सासू अनीतानेही गप्प न बसता पोलीस ठाण्यात धाव घेत जावयावर पलटवार केला आहे. तिने राहुलवर तिला ओलीस ठेवल्याचा, मारहाण केल्याचा आणि तिला विकण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. राहुलने तिचे साडेचार लाख रुपये आणि अर्धा किलो चांदी हडप केल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांची डोकेदुखी वाढली!
प्रेम, फसवणूक, पैसा आणि जादूटोणा अशा सर्व मसाला असलेल्या या प्रकरणामुळे अलीगड पोलीस चांगलेच पेचात पडले आहेत. दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल झाल्या असून, पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत. १० महिन्यांपूर्वी ज्यांच्या प्रेमाची चर्चा होती, आता त्यांच्या या रोपांची चर्चा रंगली आहे.
Web Summary : In Aligarh, a mother-in-law who ran off with her son-in-law has now allegedly fled with valuables, leaving him distraught. The jilted lover claims she used black magic. Counter accusations of abuse and theft have been filed, leaving police entangled in the bizarre case.
Web Summary : अलीगढ़ में, सास जो अपने दामाद के साथ भाग गई थी, अब कथित तौर पर कीमती सामान लेकर भाग गई, जिससे वह व्याकुल है। ठुकराए गए प्रेमी का दावा है कि उसने काला जादू किया था। दुर्व्यवहार और चोरी के जवाबी आरोप दायर किए गए हैं, जिससे पुलिस अजीबोगरीब मामले में उलझ गई है।