शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"मी एवढा अहंकारी अन् खोटारडा निवडणूक आयोग बघितला नाही"; दिल्लीत CEC ज्ञानेश कुमार यांच्या भेटीनंतर ममतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 18:49 IST

केवळ बंगाललाच का लक्ष्य केले जात आहे, असा प्रश्न करत, ९८ लाख लोकांची नावे मतदार यादीतून परस्पर हटवल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला...

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एसआयआर मुद्द्यावर सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची भेट घेतली. यानंतर, त्यांनी  निवडणूक आयोगावर अतिशय गंभीर आरोप केले."आपण आजवर एवढा अहंकारी आणि खोटारडा निवडणूक आयुक्त बघितला नाही," असे ममता बॅनर्जी यांनी म्हटेल आहे. 

"एवढा अहंकारी आणि खोटारडा निवडणूक आयोग बघितला नाही" - आयोगाच्या भेटीनंतर ममता म्हणाल्या, "आपण अतिशय दुःखी आहोत. प्रदीर्घ काळ दिल्लीच्या राजकारणात राहिलो आहोत. चार वेळा मंत्री आणि सात वेळा खासदार राहिलो आहोत. मात्र, आजवर एवढा अहंकारी आणि खोटारडा निवडणूक आयोग बघितला नाही." एवढेच नाही तर, केवळ बंगाललाच का लक्ष्य केले जात आहे, असा प्रश्न करत, ९८ लाख लोकांची नावे मतदार यादीतून परस्पर हटवल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

कोण कोण होतं शिष्टमंडळात? - यावेळी, तृणमूल काँग्रेसच्या १५ सदस्यीय शिष्टमंडळात ममता बॅनर्जी यांच्यासह अभिषेक बॅनर्जी, कल्याण बॅनर्जी आणि 'एसआयआर' (SIR) प्रक्रियेमुळे प्रभावित झालेल्या १२ कुटुंबातील सदस्यांचा समावेश होता. यांत ५ मतदार असे होते, ज्यांची नावे कागदोपत्री 'मृत' घोषित करून मतदार यादीतून वगळण्यात आली. 'एसआयआर' नोटीस मिळाल्यानंतर मृत्यू झालेल्या व्यक्तींचे ५ नातलग आणि कामाच्या दबावामुळे प्राण गमावलेल्या ३ बीएलओंच्या (BLO) कुटुंबीयांचा समावेश होता.

"SIR प्रक्रिया पक्षपाती" : TMC -दरम्यान, TMC ने आरोप केला की, पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेली SIR प्रक्रिया पक्षपाती, मनमानी, भेदभावपूर्ण आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे. याद्वारे मतदारांचे हक्क हिरावून घेतले जात आहेत. एवढेच नाही तर, या प्रक्रियेमुळे राज्यात भीतीचे वातावरण असून आतापर्यंत १४० ते १५० लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला. विशेषतः अल्पसंख्याक आणि गरीब मतदारांना यातून लक्ष्य करण्यात येत आहे. यासंदर्भात त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल केली आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Mamata Banerjee Slams Election Commission After Meeting; Calls It Arrogant, Liar

Web Summary : Mamata Banerjee criticizes the Election Commission, calling it arrogant and deceitful after meeting CEC. TMC alleges biased SIR process in Bengal, targeting minorities. They claim voter list manipulation and resulting deaths, petitioning the Supreme Court.
टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगtmcठाणे महापालिका