शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मी तुम्हाला नमस्कार करायला आलोय; मोदींनी घेतली इस्रोच्या वैज्ञानिकांची गळाभेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 08:18 IST

Narendra Modi in ISRO: बंगळुरुमध्ये भाजपाने त्यांच्या स्वागताची पुरेपूर तयारी करून ठेवली होती. सकाळी सहा वाजता मोदींचे विमान बंगळुरूच्या विमानतळावर उतरले.

चंद्रयान ३ मोहिमेवरून जगभरात इस्रोची वाहवा होत आहे. चंद्रयान २ वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात होते. बंगळुरूच्या इस्रोच्या कार्यालयात लाईव्ह पाहत होते. परंतू, तेव्हा चंद्रयान २ चे लँडिंग अपयशी झाले होते. यंदा मोदी ब्रिक्स शिखर बैठकीसाठी दक्षिण आफ्रिकेला होते. यामुळे ते चंद्रयान ३ मोहिमेच्या यशावेळी उपस्थित राहू शकले नव्हते. या दौऱ्यावरून मोदी आज भारतात परतले. परंतू, त्यांनी दिल्लीला न जाता थेट बंगळुरू गाठले. 

बंगळुरुमध्ये भाजपाने त्यांच्या स्वागताची पुरेपूर तयारी करून ठेवली होती. सकाळी सहा वाजता मोदींचे विमान बंगळुरूच्या विमानतळावर उतरले. यानंतर मोदींनी तिथे स्वागतासाठी जमलेल्या लोकांना संबोधित केले. पंतप्रधानांनी जय जवान, जय किसान, जय अनुसंधाचा नारा दिला. येथून पंतप्रधान मोदी इस्रोच्या मुख्यालयात पोहोचतील आणि चांद्रयान-३ पाठवणाऱ्या शास्त्रज्ञांच्या टीमला भेटण्यासाठी निघाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांची भेट घेतली आणि चंद्रावर चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगबद्दल त्यांचे अभिनंदन केले. इस्रोच्या मुख्यालयात पंतप्रधान मोदींना चांद्रयान-3 मोहिमेची माहिती देण्यात आली. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी पंतप्रधान मोदींना संपूर्ण मिशनची माहिती दिली. 

चांद्रयान-३ च्या लँडिंगवेळी मी दक्षिण आफ्रिकेत होतो. पण माझे मन पूर्णपणे तुमच्या यशाकडे होते. मी तुम्हाला नमस्कार करायला आलो आहे. मला तुम्हा सर्वांना बघायचे होते. मी तुम्हा सर्वांना सलाम करू इच्छितो, असे पंतप्रधान मोदी इस्रोच्या शास्त्रज्ञांना म्हणाले. यावेळी पंतप्रधान मोदी भावूक झाले होते.

आज तुम्हा सर्वांमध्ये असल्याने मला एक वेगळाच आनंद वाटत आहे. कदाचित असा आनंद फार क्वचित प्रसंगी मिळतो. 23 ऑगस्टचा प्रत्येक सेकंद माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा फिरत आहे. इस्रो केंद्रावर आणि देशभरात ज्या प्रकारे लोकांनी  आनंदाने उड्या मारल्या ते दृश्य कोण विसरू शकेल. काही आठवणी अजरामर होतात. तो क्षण अजरामर झाला. तो क्षण या शतकातील सर्वात प्रेरणादायी क्षणांपैकी एक आहे. प्रत्येक भारतीयाला आपलाच विजय वाटत होता. आजही शुभेच्छा, संदेश दिले जात आहेत. हे सर्व तुम्हीच शक्य केले आहे, असे मोदी इस्रोच्या शास्त्रज्ञांना संबोधित करताना म्हणाले. 

चंद्राच्या ज्या भागावर चंद्रयान उतरले आहे त्या भागाचे नाव भारताने ठरवले आहे. ज्या ठिकाणी लँडर उतरले आहे, तो बिंदू शिवशक्ती म्हणून ओळखला जाईल, असे मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीisroइस्रोChandrayaan-3चंद्रयान-3