शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

'मी 20 वर्षांपासून अपमान सहन करतोय', जगदीप धनखड मिमिक्री प्रकरणावर PM मोदी दुःखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 19:55 IST

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री केल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे.

Loksabha MP Suspension Mimicry of Dhankhar ( Marathi News ): तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री केल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. यावरुन धनखड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्याशी फोनवर चर्चा केली असून, या कृत्यावर दुःख व्यक्त केले. स्वतः धनखड यांनी ही माहिती दिली आहे.

संबंधित बातमी- 'मी व्हिडिओ शूट केला, पण...', जगदीप धनखड मिमिक्री प्रकरणावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

जगदीप धनखड यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत सांगितले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आला होता. काही खासदारांनी काल पवित्र संसदेच्या आवारात केलेल्या मिमिक्रीच्या घटनेबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. पंतप्रधानांनी मला सांगितले की, गेल्या वीस वर्षांपासून तेदेखील असाच अपमान सहन करत आहेत. पण, भारताच्या उपराष्ट्रपतींसारख्या घटनात्मक पदाशी आणि तेही पवित्र संसदेत असे वागणे दुर्दैवी आहे." 

"मी पंतप्रधानांना सांगितले की, काही लोकांच्या मूर्खपणाच्या कृती मला माझे कर्तव्य बजावण्यापासून आणि आपल्या संविधानात दिलेल्या तत्त्वांचा आदर करण्यापासून रोखू शकत नाहीत. मी संवैधानिक मूल्यांसाठी वचनबद्ध आहे आणि असे अपमान मला माझ्या मार्गावरुन हटवू शकत नाहीत."

राष्ट्रपतींची प्रतिक्रियायाप्रकरणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट केले की, "संसदेच्या संकुलात आदरणीय उपराष्ट्रपतींचा ज्या प्रकारे अपमान झाला, ते पाहून मी निराश झाले आहे. निवडून आलेल्या प्रतिनिधींना बोलण्याचा अधिकार आहे, परंतु त्यांची अभिव्यक्ती प्रतिष्ठा आणि शिष्टाचाराच्या निकषांमध्ये असली पाहिजे. या संसदीय परंपरेचा आपल्याला अभिमान आहे आणि हा कायम राखला जावा, अशी लोकांची अपेक्षा आहे." 

'उपराष्ट्रपतींचा अपमान सहन करणार नाही'संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी संसदेत बोलताना म्हणाले की, "मी या घटनेचा तीव्र निषेध करतो. हे लोक घटनात्मक पदावर असलेल्या लोकांचा अपमान करतात. आधी पंतप्रधानांचा अपमान करायचे, कारण ते गरीब पार्श्वभूमीतून आलेले आहेत. तुमचाही अपमान केला, कारण तुम्ही शेतकरी पार्श्वभूमीचे आहात. भारत देश उपराष्ट्रपतींचा अपमान सहन करणार नाही. "

संबंधित बातमी- राहुल गांधी बेजबाबदार, TMC खासदाराने माफी मागावी; जाट समाजाचे जगदीप धनखड यांना समर्थन

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसदRajya Sabhaराज्यसभाlok sabhaलोकसभा