शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

माझ्याजवळ दारूगोळा आणि बंदूक आहे : आमदाराचे वादग्रस्त विधान

By admin | Updated: March 24, 2016 01:53 IST

संयुक्त जनता दलाचे आमदार (संजद) नीरजकुमार ऊर्फ गोपाल मंडल यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून आपल्या पक्षाच्या सरकारला अडचणीत आणले आहे.

पुन्हा हत्येचे राजकारण करणार!एस. पी. सिन्हा,  पाटणासंयुक्त जनता दलाचे आमदार (संजद) नीरजकुमार ऊर्फ गोपाल मंडल यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून आपल्या पक्षाच्या सरकारला अडचणीत आणले आहे. ‘आता मला पुन्हा हत्येचे राजकारण सुरू करावे लागेल,’ असे भागलपूरच्या गोपालपूरचे आमदार मंडल यांनी म्हटले आहे.नवगछियाच्या बाल भारती विद्यालयात रविवारी आयोजित कवी संमेलनात मंडल बोलत होते. विरोधकांना धमकावताना मंडल म्हणाले, ‘माझ्याजवळ दारूगोळा आणि बंदूक आहे. मी तुमचे संरक्षण करणार. येथील लोकांना मी केवळ संरक्षण देऊ शकतो. संरक्षणासाठी हत्या करावी लागली तरी चालेल. मी हत्येचे राजकारण सोडून आलो आहे. पण गरज पडली तर पुन्हा हत्येचे राजकारण करेल. बिहारमध्ये दारूबंदी लागू होऊ शकत नाही. दारू नसेल तर होळीत मन तरी कसे डोलणार?’मंडल यांनी भागलपूरचे खासदार शैलेश कुमार मंडल यांच्यावरही टिप्पणी केली. ‘मी एखाद्या कार्यक्रमाला जातो, तेव्हा खासदारांची वाट पाहतो. परंतु ते मात्र आधीच पोहोचतात आणि माझी वाट न पाहता कार्यक्रमाचे उद्घाटन करून मोकळे होतात. नंतर सांगतात की ही माझी स्टाईल आहे,’ असे मंडल म्हणाले.गेल्या २८ फेब्रुवारी रोजी मंडल यांनी विरोधकांना अशीच धमकी दिलेली होती. ‘माझा एक पाय जेलमध्ये आणि दुसरा बाहेर असतो. जेलमध्ये गेलो म्हणूनच नेता बनलो. माझ्या कार्यकर्त्यांसोबत जो कुणी जातीभेद करेल आणि बोट दाखवेल, त्याचा मी हात छाटून टाकीन. कुणी जर शिवी दिली तर त्याची जीभ कापेल,’ असे ते म्हणाले होते.दरम्यान संजदचे नगरसेवक राणा गंगेश्वर यांनीही वादग्रस्त विधान केले आहे. समस्तीपूर येथे बिहार दिवस कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, ‘राष्ट्रगीत हे गुलामगिरीचे प्रतीक आहे.’ यावर उपस्थित लोक भडकले, तेव्हा गंगेश्वर शांत झाले.दरम्यान संजदने आ. मंडल आणि गंगेश्वर या दोघांनाही पक्षातून निलंबित केले आहे. पक्षाध्यक्ष शरद यादव यांनी या दोघांच्या निलंबन कारवाईवर शिक्कामोर्तब केले.