शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

४० लाखांचं कर्ज झालंय, पण आता गाव सोडणार नाही, इथेच शेती करेन; अमेरिकेनं डिपोर्ट केलेल्या देवेंद्रला चूक उमगली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 12:59 IST

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून ॲक्शनमोडवर आले आहे. अवैध मार्गाने अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्यांविरोधात ट्रम्प यांनी कारवाई सुरु केली आहे.

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump ) सत्तेवर आल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून ॲक्शनमोडवर आले आहे. अवैध मार्गाने अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्यांविरोधात ट्रम्प यांनी कारवाई सुरु केली आहे, दोन दिवसापूर्वी अमेरिकेच्या लष्कराच्या विमानाने १०४ अवैध मार्गाने घुसखोरी करणाऱ्या भारतीयांना अमृतसर विमानतळावर सोडले, यावरुन काल संसदेतही गोंधळ झाला. विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांना घेरलं. दरम्यान, कालपासून डिपोर्ट केलेल्यांनी माध्यमांना मुलाखती दिल्या आहेत. उत्तर प्रदेशमधील देवेंद्र यांची 'आज तक' या वृत्तवाहिनीने मुलाखत घेतली. यावेळी देवेंद्र यांनी अमेरिकेपर्यंत ( America ) अवैध मार्गाने केलेल्या प्रवासाचा घटनाक्रम सांगितला आणि यापुढे गाव सोडणार नाही इथंच राहून शेती करणार असल्याचे सांगितले. 

Mahakumbh Fire: महाकुंभमध्ये तिसऱ्यांदा आग लागली, वेळेवर अग्निशमन दल पोहोचले, मोठा अनर्थ टळला

देशातील शेकडो जण आहेत, जे अवैध मार्गाने लाखो रुपये खर्च करुन अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न करतात. उत्तर प्रदेशमधील देवेंद्र यांनीही असाच प्रयत्न केला होता, त्यांना अमेरिकेपर्यंत जाण्यासाठी तब्बल ४० लाख रुपये खर्च आला होता. देवेंद्र यांचा भारतातून सुरू झालेल्या प्रवास अमेरिकेपर्यंत पोहोचेपर्यंत भयानक होता अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

देवेंद्र सांगतात, माझ्यासह अनेकांनी अमेरिका सीमामध्ये प्रवेश केला. यानंतर लगेच काही वेळात आम्हाला अमेरिका बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने ताब्यात घेतले. यानंतर बेड्या लावून कॅम्पमध्ये पाठवून दिले. २० दिवस आम्हाला कॅम्पमध्ये बसवून ठेवले. तिथे खाणे-पिणे वाईट दर्जाचे होते, थंडी जास्त होती. काही दिवसापूर्वी अचानक आम्हाला बेड्या लावून एका विमानात बसवले आणि थेट अमृतसर विमानतळावर सोडले. 

"आम्हाला २ फेब्रुवारी रोजी त्यांना अमेरिकेतून बाहेर काढले आणि ५ फेब्रुवारी रोजी भारतात सोडले. आता मी कुठेही जाणार नाही, गावी राहूनच शेती करेन, ४० लाख रुपयांचं कर्ज फेडायचं आहे, असंही देवेंद्र सांगतात. 

अमेरिकेत पोहोचण्यासाठी ४० लाख रुपये खर्च केले

उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या रक्षित आणि देवेंद्र यांनी अमेरिकेपर्यंत ( America )  पोहोचण्यासाठी ४० लाख रुपये खर्च केले. अवैध मार्गाने प्रवास केला पण पुन्हा पकडून भारतात आणून सोडले. देवेंद्र म्हणाले, २९ नोव्हेंबर रोजी आम्ही भारत सोडले. आधी थायलंडमध्ये पोहोचलो, यानंतर व्हिएतनामला पोहोचलो. व्हिएतनाममध्ये काही दिवस थांबल्यानंतर आम्ही चीनमध्ये पोहोचलो. पुढे आम्ही चीनमध्ये १७ दिवस थांबलो, यानंतर आम्ही साल्वाडोरचा व्हिजी मिळवला आणि तिथे पोहोचलो. साल्वाडोरमध्ये दोन दिवस थांबल्यानंतर आम्हाला एका माफिया एजंटने पकडले. 

देवेंद्र म्हणाले, साल्वाडोर मध्ये एका एजंटने आमच्याकडून १० लाख रुपयांची खंडणी मागितली. ही रक्कम हरयाणा येथील एका एजंटकडे द्यायला सांगितली. तो एजंट भारतातील नेटवर्क सांभाळतो. यानंतर आम्हाला ग्वाटेमाला येथे आणण्यात आले. तिथे पुन्हा १० लाख रुपये द्यायला लागले. 

देवेंद्र म्हणाले, ही संपूर्ण प्रक्रिया तेथील माफियांकडून नियंत्रित केली जाते. मेक्सिको, एल साल्वाडोर आणि ग्वाटेमाला येथील माफिया हे व्यवसाय चालवतात. हे लोक स्थलांतरितांना ओलीस ठेवतात, त्यांच्याकडून पैसे उकळतात आणि नंतर त्यांना पुढे जाऊ देतात. आम्हाला आणि आमच्या साथीदारांना मेक्सिको सिटी आणि नंतर तिजुआना येथे नेण्यात आले. तिजुआना हे अमेरिका-मेक्सिको सीमेजवळील एक शहर आहे, जिथून अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी बेकायदेशीर मार्गांचा अवलंब केला जातो. १५ फूट उंच अमेरिकन भिंतीवर माफियांनी लोखंडी शिडी बसवली आहे. त्या शिडीचा वापर करून स्थलांतरितांना एक एक करून भिंत ओलांडण्यास भाग पाडले जाते. दुसऱ्या बाजूला आणखी एक जिना आहे, जिथून ते खाली जातात. अमेरिकेतील ( America )  सीमा सुरक्षा गस्त घालत असतात, यावेळी ते लगेच ताब्यात घेतात. स्थलांतरितांना हेल्पलाइनवर कॉल करून स्वतःला शरण जावे लागते.

टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प