शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
6
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
7
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
8
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
9
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
10
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
11
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
12
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
13
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
14
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
15
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
16
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
17
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
18
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
19
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
20
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश

कपबशा धुवत, लोकांना चहा देत मी मोठा झालो; चहाशी माझे नाते खूप गहिरे: पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 15:47 IST

मोदींनी भाषणात कपबशीसोबतचे आपले नाते सांगत मोठ्या खुबीने मित्रपक्षाला मतदान करण्याचे उपस्थितांना आवाहन केले

मिर्झापूर: कपबशा धुवत आणि लोकांना चहा देत मी लहानाचा मोठा झालो. मोदी व चहाचे नाते खूप गहिरे आहे, असे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी रविवारी म्हटले. रालोआचा घटकपक्ष असलेल्या अपना दल-एसचे कपबशी हे निवडणूक चिन्ह आहे. मोदींनी भाषणात कपबशीसोबतचे आपले नाते सांगत मोठ्या खुबीने मित्रपक्षाला मतदान करण्याचे उपस्थितांना आवाहन केले.

मोदी रालोआचा उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर लोकसभा मतदारसंघातील अपना दलच्या उमेदवार अनुप्रिया पटेल, रॉबर्टसगंजमधील उमेदवार रिंकी कोल यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला संबोधित करत होते. 

मोदी म्हणाले, आज मी भाषण न करता तुमच्याशी गप्पाटप्पा करेन. तुम्ही-आम्ही जेव्हा घर उभारतो आणि घर उभारताना एखादा मिस्त्री  ठेवतो. तेव्हा आपण काय दर महिन्याला नवा मिस्त्री ठेवतो का? म्हणजे एक महिना हा मिस्त्री काम  करेल, दुसऱ्या महिन्यात  दुसरा, तिसऱ्या महिन्यात तिसरा आणि चौथ्या महिन्यात चौथा. असे झाले तर ते घर बांधून तरी पूर्ण होईल का? तसेच ते घर राहण्यालायक असेल का असा सवाल मोदींनी केला.

इंडिया आघाडी समुदायाला दुय्यम दर्जाचे नागरिक बनवू इच्छिते!

मऊ (उप्र): काँग्रेस आणि सपाची इंडिया आघाडी भारतातील बहुसंख्याक समुदायाला दुय्यम दर्जाचे नागरिक बनवू इच्छिते, असा घणाघात पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केला. ते म्हणाले की, ‘पूर्वांचलची ही भूमी शौर्य आणि क्रांतीची भूमी आहे. सपा आणि काँग्रेसच्या घराणेशाहीने पूर्वांचलला माफिया, दुर्भिक्ष्य, दारिद्र्य व असहाय्यतेचे क्षेत्र बनवले आहे. मात्र, गेल्या १० वर्षांपासून पूर्वांचल देशाच्या पंतप्रधानांची आणि सात वर्षांपासून उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची निवड करत आहे आणि म्हणूनच पूर्वांचल हे सर्वात खास आहे.

हे लोक कट्टर जातीयवादी आहेत... 

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांची इंडिया आघाडी जातीयवादी असल्याची टीका केली.
  • मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी या आघाडीने राज्यघटना बदलण्याचा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला. देशातील जनतेने इंडिया आघाडीला पुरेपूर ओळखले आहे.
  • हे लोक कट्टर जातीयवादी आहेत. जेव्हा ते सरकार स्थापन करतील तेव्हा ते या आधारावरच निर्णय घेतील, असा दावाही मोदींनी केला.

पाच वर्षांत पाच पंतप्रधान योग्य आहे?

छोटे घर बांधत असतानाही कोणी वारंवार मिस्त्री बदलत नाहीत. मग पाच वर्षांत पाच पंतप्रधान बदलणे कितपत योग्य आहे, असा सवाल मोदींनी केला.

टॅग्स :prime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी