शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

चित्रपटगृहात राष्ट्रगीतादरम्यान मला उभं राहायला आवडत नाही - पवन कल्याण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 11:39 IST

चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवले जाते तेव्हा मला उठून उभे राहावेसे वाटत नाही असं पवन कल्याण यांनी म्हटलं आहे.

ठळक मुद्दे चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवले जाते तेव्हा मला उठून उभे राहावेसे वाटत नाही असं पवन कल्याण यांनी म्हटलं आहे. राजकीय पक्ष त्यांची बैठक सुरू करण्याआधी राष्ट्रगीत का वाजवत नाहीत? केवळ चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवण्याचे बंधन का?देशातील सर्वोच्च (सरकारी) कार्यालयांमध्येही राष्ट्रगीत वाजवले जावे.

कुरनूल - दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार आणि जन सेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनी चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्याआधी वाजवण्यात येणाऱ्या राष्ट्रगीतासंदर्भात एक वक्तव्य केलं आहे. चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवले जाते तेव्हा मला उठून उभे राहावेसे वाटत नाही असं पवन कल्याण यांनी म्हटलं आहे. आंध्रप्रदेशमधील कुरनूल जिल्ह्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पवन यांनी राष्ट्रगीतासंदर्भातील आपलं मत व्यक्त केलं आहे. 

'चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवले जाते तेव्हा मला उभे राहायला आवडत नाही. कुटुंबाबरोबर आणि मित्रमंडळींबरोबर निवांत चित्रपट पाहण्याच्या उद्देशाने चित्रपटगृहात गेल्यानंतर आधी प्रत्येकाला आपण देशभक्त असल्याचे दाखवावे लागते, हे चुकीचे आहे,’ असं पवन कल्याण यांनी म्हटलं आहे. 

'राजकीय पक्ष त्यांची बैठक सुरू करण्याआधी राष्ट्रगीत का वाजवत नाहीत? केवळ चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवण्याचे बंधन का?, देशातील सर्वोच्च (सरकारी) कार्यालयांमध्येही राष्ट्रगीत वाजवले जावे. जे लोक आपल्यासाठी नियम आणि कायदे तयार करतात त्यांनीच ते अमलात आणून सामान्यांसमोर एक आदर्श निर्माण करावा' असं मत पवन कल्याण यांनी व्यक्त केलं. तसेच राष्ट्रगीतासंदर्भात राजकीय पक्षांना आणि नेत्यांना प्रेम नाही का अशा आशयाचा प्रश्न पवन कल्याण यांनी उपस्थित केला आहे. 2016 मध्ये सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या एका निर्णयामध्ये चित्रपटगृहात राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ सर्वांनी उभे राहणे अपेक्षित असल्याचे म्हटले होते. त्यावेळीही पवन कल्याण यांनी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात नाराजी दर्शवली होती. 

पवन कल्याण यांनी काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीआधी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध होईल ही गोष्ट एका भाजपा नेत्याने दोन वर्षांपूर्वीच आपणास सांगितली होती असा धक्कादायक गौप्यस्फोट केला होता. केवळ निवडणुका जिंकण्यासाठी मुद्दाम युद्ध जनतेवर लादले जात असेल तर देशातील परिस्थिती काय आहे हे समजू शकते असेही त्यांनी म्हटले होते. तसेच पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावरील हल्ल्याने युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली. देशभक्तीचा मक्ता एकट्या भाजपाचा नाही. भाजपावाल्यांपेक्षा आम्ही दहा पटीनी राष्ट्रभक्त आहोत. मुसलमानांना देशभक्ती सिद्ध करण्याची मुळीच गरज नाही असे सांगतानाच समाजात कलह निर्माण करण्याचा प्रयत्न ‘जनसेना’ उधळून लावेल असे ते म्हणाले होते.  

टॅग्स :National Anthemराष्ट्रगीतcinemaसिनेमाTheatreनाटक