शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

'मला अशा मुली आवडत नाहीत, ज्या...'; भाजप नेत्याचे कपड्यांबद्दल वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 15:52 IST

Kailash Vijayvargiya Controversy: स्त्रियांच्या पेहरावाबद्दल बोलताना भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी एक विधान केले. या विधानाने नव्या वादाला तोंड फुटले आहे. 

Kailash Vijayvargiya Controversy News: भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय एका विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मुलींच्या कपड्यांबद्दल बोलताना कैलाश विजयवर्गीय यांनी हे विधान केले. 'मला अशा मुली आवडत नाही, ज्या छोटे कपडे घातलात', असे विजयवर्गीय म्हणाले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

कैलाश विजयवर्गीय यांच्या भाषणाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंदूरमधील एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले. 

मुलींच्या कपड्यांबद्दल काय बोलले विजयवर्गीय?

नगरविकास मंत्री कैलाश विजयवर्गीय इंदूरमधील एका कार्यक्रमाला उपस्थित होते. ते म्हणाले, "आपल्याकडे काय चांगलं आहे तर मुलींनी चांगला सांजश्रृंगार करावा. त्यांनी चांगले दागिने घालावेत. चांगले कपडे घालावेत. अशा मुलीला आपण सुंदर म्हणतो."

वाचा >>एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन

"परदेशात जी कमी कपडे घालते, तिला सुंदर म्हटलं जातं. असं म्हटलं जातं की, कमी कपडे घालणारी मुलगी जशी सुंदर असते, तसंच कमी भाषण करणारा नेताही चांगला असतो. अशी म्हण परदेशात आहे. आपल्याकडे मी याचं पालन करत नाही", असे विजयवर्गीय म्हणाले. 

'मी मुलींना सांगतो की चांगले कपडे घालून या'

मंत्री कैलाश विजयवर्गीय पुढे बोलताना म्हणाले की, "माझं मत असं आहे की, आपल्या इथे महिलांना देवी मानतात. चांगले कपडे परिधान करावेत. मला तर कमी कपडे घालणाऱ्या मुली आवडत नाहीत. कधी कधी मुली जेव्हा माझ्यासोबत सेल्फी काढायला येतात, तेव्हा मी त्यांना सांगतो की, बेटा, पुढच्या वेळी व्यवस्थित कपडे घालून ये, मग आपण फोटो काढू."

२०२२ मध्ये स्त्रियांना म्हणाले होते शूर्पनखा

कैलाश विजयवर्गीय यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिले आहेत. २०२२ मध्येही त्यांनी मुलींच्या कपड्यांबद्दल विधान केले होते. 

हनुमान जयंतीनिमित्त इंदूरमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. त्यात ते म्हणाले होते की, 'मी हनुमान जयंतीच्या दिवशी खोटं बोलणार नाही. पण, आजकाल मुली असे घाणेरडे कपडे घालू लागल्या आहेत. आपण स्त्रियांना देवी मानतो, पण त्या तशा दिसत नाहीत. त्या शूर्पनखेसारख्या दिसतात. आपल्या मुलांना संस्कार शिकवा', असे ते म्हणाले होते. 

टॅग्स :BJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेश