शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

"मी दु:खी मनाने…’’ सभागृहातून अचानक निघून गेले उपराष्ट्रपती धनखड, नेमकं घडलं काय?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 13:47 IST

Jagdeep Dhankhad News: सभागृहामध्ये दररोज माझा अपमान केला जात आहे. आसनावर ओरडून बोलण्याची तुमची हिंमत कशी झाली? असा संतप्त सवाल जगदीप धनखड विचारला. (Rajya Sabha) त्यानंतर ते सभापतींच्या आसनावरून उठून निघून गेले.

भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट हिला ऑलिम्पिकमधून बाद करण्याच्या निर्णयाविरोधात देशात संतापाची लाट आहे. तसेच त्याचे पडसाद संसदेमध्येही उमटत आहेत. दरम्यान, आज राज्यसभेमध्ये विनेशवरून जोरदार गदारोळ झाला. दरम्यान, हा गदारोळ एवढा वाढला की, सभापती जगदीप धनखड यांना जड अंत:करणानं आसनावरून उठावं लागलं. त्यांनी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्या वर्तनावर ताशेरे ओढले. तसेच सभागृहाच्या नियमानुसार वर्तन करण्यास सांगितले. संतप्त झालेल्या जगदीप धनखड यांनी सांगितले की, सभागृहामध्ये दररोज माझा अपमान केला जात आहे. आसनावर ओरडून बोलण्याची तुमची हिंमत कशी झाली? असा संतप्त सवाल त्यांनी विचारला. त्यानंतर ते सभापतींच्या आसनावरून उठून निघून गेले.

त्याचं झालं असं की, विनेश फोगाट हिला ऑलिम्पिकमधून बाद करण्याच्या निर्णयाविरोधात विरोधी पक्ष सभागृहात प्रश्न उपस्थित करू इच्छित होते. मात्र या मुद्द्यावर चर्चा घेण्यास सभापती जगदीप धनखड हे अनुत्सुक होते. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन हा मुद्दा सभागृहात मांडण्याचा प्रयत्न करत होते. त्यादरम्यान झालेल्या गोंधळामुळे सभापती धनखड हे नाराज झाले. त्यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून सभापतींच्या अधिकारांना आव्हान देणं हे असंसदीय असल्याचे खडसावून सांगितले. 

याबाबत जगदीप धनखड म्हणाले की, हे माझ्यासाठी आव्हान नाही आहे. तर हे राज्यसभेच्या सभापतिपदासाठी आव्हान आहे. त्यांना वाटतं की, या आसनावर बसलेली व्यक्ती या पदासाठी पात्र नाही आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांना न हसण्याची ताकिद दिली. तसेच मी दु:खी मनाने या आसनावरून उठत आहे, असे सांगितले आणि ते निघून गेले.  

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाParliamentसंसद