शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मी एकटा जाण्यास तयार तरीही पीडितांना भेटू दिले नाही : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 08:30 IST

सीमेवरच रोखल्यामुळे संभलला भेट न देताच माघारी परतले

गाझियाबाद : संभल हिंसाचारातील पीडितांना भेटू न देणे व  तिथे जाण्याची परवानगी नाकारून सरकारने लोकसभा विरोधी पक्षनेत्याच्या विशेष अधिकाराचे उल्लंघन केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. हिंसाचार पीडितांना भेटण्यासाठी बुधवारी राहुल, प्रियांका व काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते संभलला निघाले होते. मात्र, दिल्ली-गाझीपूर सीमेवर त्यांना रोखण्यात आले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधींनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. सीमेवर रोखल्यामुळे संभलला भेट न देताच गांधींना दिल्लीला परतावे लागले.

आम्ही हिंसाचार पीडितांना भेटण्यासाठी संभलला जाण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र, पोलिस आमचे ऐकायला तयार नाहीत. मी नजरकैदेत आहे. ही गुंडागर्दी आहे, असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींना रोखल्यानंतर काँग्रेस आणि विरोधी इंडिया आघाडीने सरकारवर टीका केली.

प्रियांका गांधींकडून नाराजी व्यक्त

nदिल्ली-गाझीपूर सीमेवर राहुल यांना पोलिसांनी रोखल्यामुळे काँग्रेस खासदार प्रियांका गांधींनी नाराजी व्यक्त केली. संभलमध्ये जे घडले ते अत्यंत चुकीचे आहे.

nराहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते असून, पीडितांना भेटण्याचा त्यांच्याकडे संवैधानिक अधिकार आहे. त्यामुळे संभलला जाण्यापासून त्यांना रोखले जाऊ शकत नसल्याचे त्या म्हणाल्या.

संभलमध्ये नेमके काय घडले ते पाहणे अधिकार

पोलिसांसोबत एकट्याने जाण्याची तयारीही मी दाखवली. मात्र त्यांनी आम्हाला जाऊ दिले नाही. हे कृत्य लोकशाहीविरोधी असल्याचे स्पष्ट करत राहुल गांधींनी हातातील संविधानाची प्रत दाखवली.

संभलमध्ये नेमके काय घडले ते आम्हाला पाहायचे आहे. पीडित लोकांना भेटणे हा माझा संवैधानिक अधिकार आहे.

मला त्या अधिकारापासून वंचित ठेवले गेले. हा संविधानाला संपविणारा भारत आहे. मात्र आम्ही लढू, असे राहुल म्हणाले.

दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस-वेवर चक्का जाम

nराहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वीच काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस-वेवरील बॅरिकेड्स तोडले. त्यामुळे या द्रुतगती महामार्गावर जवळपास चार तास वाहतूक कोंडी झाली.

nमात्र, पोलिसांनी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुन्हा बॅरिकेड्स उभारत वाहनांची तपासणी सुरू केली. त्यामुळे उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. यामुळे प्रवाशी प्रशासनावर वैतागले होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस