शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

'मी अंधारात लढाई लढतोय'; मोदींचे हेलिकॉप्टर तपासणाऱ्या अधिकाऱ्याची उद्विग्न प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 07:43 IST

गेल्या आठवड्यात 17 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओडिशातील संबलपूर लोकसभा मतदारसंघात प्रचारसभेसाठी आले होते. यावेळी 1996 मधील बॅचच्या आयएएस अधिकारी मोहम्मद मोहसिन यांनी त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली.

भुवनेश्वर : ओडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. यावर उद्विग्न झालेल्या या अधिकाऱ्याने मी माझे कर्तव्य पार पाडत होतो. मात्र, निलंबित करण्यात आले, याविरोधात मी न्यायालयात दाद मागणार असल्याचे म्हटले आहे. 

गेल्या आठवड्यात 17 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओडिशातील संबलपूर लोकसभा मतदारसंघात प्रचारसभेसाठी आले होते. यावेळी 1996 मधील बॅचच्या आयएएस अधिकारी मोहम्मद मोहसिन यांनी त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. यामुळे त्यांच्यावर एसपीजी सुरक्षेतील महनीय व्यक्ती या अशा प्रकारच्या तपासणीपासून मुक्त असतानाही त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि निलंबन करण्यात आले. 

केंद्रीय प्रशासनिक ट्रिब्यूनलकडून गुरुवारी मोहसिन यांच्या निलंबनाला स्थगिती दिली आहे. मात्र, निवडणूक आयोगाने त्यांच्याविरोधात नियम मोडल्याबद्दल कारवाई करण्याची सूचना केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मोहसिन यांनी एका टीव्ही चॅनलला सांगितले की, ''मी माझे काम करत असतानाही मला निलंबित करण्यात आले. या संबंधातील एकही अहवाल मला देण्यात आला नाही. मी अंधारात लढाई लढत आहे.''

 

विरोधी पक्षांचा आरोपविरोधी पक्षांनी असा कोणताही नियम नसल्याचा आरोप केला आहे. निवडणूक काळात अशा प्रकारे कोणाची तपासणी करू शकत नाही असा कोणताही नियम नाही. या तपासणीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 15 मिनिटे उशिर झाला होता. मोहम्मद मोहसिन हे 1996 च्या बॅचमधील कर्नाटक केडरचे आयएएस अधिकारी आहेत. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचेही हेलिकॉप्टर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने मंगळवारी तपासले होते. तसेच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचेही हेलिकॉप्टर संबलपूरमध्ये मंगळवारी तपासण्यात आले होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक