शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
3
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
4
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
5
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
6
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
7
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
8
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
9
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
11
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
12
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
13
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
14
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
15
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
17
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
18
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
19
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
20
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?

Hydrogen Trains: भारतात लवकरच धावणार 'हायड्रोजन ट्रेन', रेल्वेने पूर्ण केली तयारी; जाणून घ्या रुट्स..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 15:35 IST

Hydrogen Train in India: केंद्रीय मंत्री अश्वीनी वैष्णव यांनी सांगितले की, या ट्रेनचे नाव 'वंदे मेट्रो' ठेवण्यात येणार आहे.

Hydrogen Train: देशात ग्रीन एनर्जीला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वे (Indian Railways) लवकरच 'हायड्रोजन ट्रेन' (Hydrogen Train) सुरू करणार आहे. रेल्वेने यासाठी तयारीही पूर्ण केली आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी ही ट्रेन देशातील 8 हेरिटेज मार्गांवर चालवली जाईल. या हायड्रोजन ट्रेनसाठी अनेक बदल करण्यात येणार आहेत. या ट्रेनच्या रचनेतही फरक असेल. हायड्रोजन ट्रेन्स 1950-60 च्या गाड्यांची जागा घेतील. डिसेंबर 2023 पर्यंत या हायड्रोजन ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. 

हायड्रोजन ट्रेनला 'वंदे मेट्रो' नाव देण्यात येणार हायड्रोजन ट्रेनबाबत सरकारने विशेष नियोजन केले आहे. सरकारने हायड्रोजन फॉर हेरिटेज (Hydrogen for Heritage) नावाचा प्रकल्प सुरू केला असून, त्याअंतर्गत या गाड्या हेरिटेज मार्गांवर चालवल्या जातील. रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव (Railway Minister Ashwani Vaishnav) म्हणाले की, या गाड्या चालवल्याने देश हरित ऊर्जेच्या दिशेने पुढे जाईल. याआधीच केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले होते की, नव्याने तयार करण्यात आलेल्या या हायड्रोजन ट्रेनला  'वंदे मेट्रो' असे नाव दिले जाईल. 

या मार्गांवर हायड्रोजन ट्रेन धावणार हायड्रोजन ट्रेन माथेरान हिल, दार्जिलिंग हिमालयन, कालका शिमला, कांगडा व्हॅली, बिलमोरा वाघाई, महू पातालपाणी, निलगिरी माउंटन रेल्वे आणि मारवाड-देवगड मदरिया या मार्गावर धावणार आहे. नंतर ती इतर मार्गांसाठी चालवली जाईल.

हायड्रोजन ट्रेन कुठे धावतेहायड्रोजन ट्रेन सुरू करणारा भारत हा पहिला देश नाही. यापूर्वी ही ट्रेन जर्मनी आणि चीनमध्ये धावत आहे. या वर्षी जुलैमध्ये जर्मनीमध्ये हायड्रोजन ट्रेन धावली होती. त्याची एकूण अंदाजे एकूण किंमत $86 दशलक्ष आहे. ताशी 140 किमी वेगाने ती एका वेळी 1000 किमी धावू शकते. 2018 मध्ये त्याची चाचणी घेण्यात आली. चीनने अलीकडेच आशियातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हायड्रोजनवर चालणाऱ्या या ट्रेनचा टॉप स्पीड 160 किमी प्रति तास आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव