शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! गृहमंत्री अमित शाहांच्या सुरक्षेत मोठी चूक, TRS नेत्यानं थेट शाहांसमोरच कार लावली आडवी अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 13:48 IST

हैदराबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची माहिती समोर आली आहे.

हैदराबाद-

हैदराबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार तेलंगना राष्ट्र समितीच्या (टीआरएस) एका कार्यकर्त्यानं अमित शाहांच्या ताफ्यासमोरच आपली कार आडवी लावली. यामुळे एकच गदारोळ उडाला. पोलिसांना ही कार हटवावी लागली. वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, जी श्रीनिवास नावाच्या टीआरएस नेत्याने गृहमंत्री अमित शाह यांच्या ताफ्यासमोर कार पार्क केली होती. श्रीनिवास यांनी मात्र आपली कार आपोआप थांबली आणि त्यावेळी मी खूप टेन्शनमध्ये आलो होतो. याबाबत मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणार आहे, असं म्हटलं आहे. 

पोलिसांनी जबरदस्तीनं गाडी बाजूला करताना तोडफोड केल्याचा आरोप टीआरएस नेत्यानं केला. "मी निघून जात असतानाही हे प्रकरण जाणीवपूर्वक वाढवलं गेलं", असा आरोप श्रीनिवास यांनी केला आहे. केंद्र सरकारकडून आज 'हैदराबाद मुक्ती दिना'निमित्त सिकंदराबादमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शहा हे प्रमुख पाहुणे असून या कार्यक्रमानिमित्त ते हैदराबाद दौऱ्यावर आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी आज हैदराबाद मुक्तीसंग्रामाचं श्रेय सरदार वल्लभभाई पटेल यांना दिलं. तसंच व्होट बँकेच्या राजकारणामुळे आणि रझाकारांच्या "भीती"मुळे "मुक्ती दिन" साजरा करण्याच्या वचनावर पाणी सोडणाऱ्यांना शाहांनी आपल्या भाषणातून फटकारलं.

सरदार पटेल नसते तर...हैदराबाद मुक्ती दिनानिमित्त हैदराबाद येथे आयोजित कार्यक्रमात शाह म्हणाले की, जर सरदार पटेल नसते तर हैदराबाद मुक्त व्हायला अजून बरीच वर्षे लागली असती. निजामाच्या रझाकारांचा पराभव झाल्याशिवाय अखंड भारताचे स्वप्न साकार होणार नाही हे पटेलांना माहीत होतं, असे ते म्हणाले. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. 'इतक्या वर्षांनंतर सरकारच्या सहभागाने ‘हैदराबाद मुक्ती दिवस’ साजरा व्हावा, ही या भूमीतील जनतेची इच्छा होती, मात्र ७५ वर्षांनंतरही मतपेटीचं राजकारण सुरू आहे, हे दुर्दैव आहे. इथे यामुळे "हैदराबाद मुक्ती दिन" साजरा करण्याचं धाडस काहींना जमलं नाही', असंही शाह म्हणाले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाह