शहरं
Join us  
Trending Stories
1
'हो, मी पुतीन यांच्यावर खूपच नाराज आहे, पण..."; डोनाल्ड ट्रम्प यांची रोखठोक भूमिका, काय सांगितले?
2
निवडक १२० पदाधिकारी, १०९ मिनिटांचं प्रश्नोत्तराचे सत्र; मनसे शिबिरात राज ठाकरे काय बोलले?
3
Stock Market Today: ३६ अंकांनी घसरुन सेन्सेक्स उघडला; मेटल क्षेत्रात घसरण, IT मध्ये तेजी; HDFC-Infosys सह 'यात' तेजी
4
२० गुप्त तळघरे, दुबईच्या मौलानाकडून ट्रेनिंग, पुस्तकातून पसरवला द्वेष! छांगुर बाबाचा नेमका प्लान काय होता? 
5
एक स्कीम मुलीसाठी, दुसरी सर्वांसाठी; पाहा तुमच्या गरजेनुसार NPS वात्सल्य-सुकन्यापैकी कोणती आहे बेस्ट?
6
उत्तेजक व्हिडिओ अन् अश्लील भाषा वापरून कमवायचे दरमहिना ३५ हजार; पोलीस तपासात केले कबूल 
7
पोलीस ठाण्यात काम करता करता होमगार्डसोबत पळून गेली तीन मुलांची आई! पोलिसांत धाव घेत पती म्हणाला... 
8
नर्स निमिषा प्रियाचा जीव वाचवला जाऊ शकतो! जिथे सरकारनेही आशा सोडली, तिथे 'या' व्यक्तीने सांगितला मार्ग
9
चालकांत रंगला भाड्यावरून वाद, मृतदेह ३ तास शवागारात; तेलंगणातील बांधकाम मजुराचे मृत्युनंतरही हाल
10
लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचं निधन, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
11
Russian Woman : गुहेत सापडलेल्या रशियन महिलेचे गुढ उकलले; एका व्यावसायिकाच्या होती प्रेमात, मुलांचे वडील सापडले
12
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
13
संतापजनक! प्राध्यापक व्हिडिओसह ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार करत होता; तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
14
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
15
"माझी इच्छा नव्हती पण मला फाशी घ्यायला भाग पाडलं"; सोलापूरातील तरुणाने चिठ्ठी लिहून आयुष्य संपवलं
16
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
17
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
18
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
19
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
20
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक

Hyderabad Encounter: ​​​​​​​सज्जनार पोलीस अधीक्षक असतानाही चकमकीत ठार झाले तीन आरोपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 04:20 IST

या आरोपींनी अचानक हल्ला केल्याने पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात ते तीनही जण ठार झाले.

वरंगळ : सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार पूर्वी वरंगळ जिल्ह्यात पोलीस अधीक्षक दोन मुलींवर अ‍ॅसिड फेकणारे तीन आरोपीही पोलीस चकमकीत अशाच प्रकारे मारले गेले होते. त्यावेळीही आरोपींना तपासासाठी घटनास्थळी नेले असताना आरोपींनी आमच्यावर हल्ला केला आणि आम्ही स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात आरोपी ठार झाले, असेच पोलिसांनी सांगितले होते.

हा प्रकार डिसेंबर २00८ मध्ये घडला होता. त्या प्रकरणात तीन आरोपी होते. अ‍ॅसिड हल्ला प्रकरणातील आरोपींनी वापरलेली मोटारसायकल ताब्यात घेण्यासाठी पोलीस गेले होते. त्यावेळी आरोपींनाही सोबत नेण्यात आले होते.

या आरोपींनी अचानक हल्ला केल्याने पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात ते तीनही जण ठार झाले. अ‍ॅसिड हल्ल्यात गंभीररीत्या भाजलेल्या दोघींपैकी एक मुलगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मरण पावली होती. त्या घटनेनंतरही अनेकांनी व्ही. सी. सज्जनार यांचे कौतुक केले होते. गुन्हेगारांचा कर्दनकाळ असेच त्यांचे वर्णन केले गेले होते. मात्र त्या चकमकींविषयीही अनेकांनी शंका व्यक्त केली होती. आताही त्याचप्रकारे चकमक झाली, त्यामुळे अनेकांना वरंगळमधील घटनेची आठवण होत आहे. आताही हैदराबाद वा तेलंगणा राज्यच नव्हे, तर देशभरात त्यांचे कौतुक केले जात आहे.खूपच साधर्म्यवरंगळमधील ती घटना व हैदराबादमधील शुक्रवारची चकमक यांच्यात खूपच साधर्म्य असल्याचे दिसत आहे. वरंगळ शहरातील एक व्यावसायिक अमरनाथ यांनी सांगितले की, २००८ साली अ‍ॅसिड हल्ला झालेल्या मुलींबद्दल आम्हाला हळहळ वाटत होती. त्या प्रकरणातील तीन आरोपी चकमकीत मारले गेल्याने आम्हाला दिलासाही मिळाला होता. आता पशुवैद्यकीय तरुणीवर झालेल्या बलात्कारातील चार आरोपीही याच प्रकारे चकमकीत मारले गेले आहेत. या विद्यार्थीनीच्या कुटुंबियांना न्याय मिळाला आहे, असेच आम्हाला वाटत आहे.

टॅग्स :hyderabad caseहैदराबाद प्रकरण