शहरं
Join us  
Trending Stories
1
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
2
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
3
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
8
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
9
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
10
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
11
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
13
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
14
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
15
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

हैदराबादमध्ये 700 कोटींच्या सायबर फ्रॉडचा भांडाफोड, चीन आणि दहशतवादी गटाला पाठवले पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 20:20 IST

Hyderabad Cyber Fraud: सूमारे 15000 भारतीयांची फसवणूक झाली असून, 113 भारतीय बँक खात्यांचा वापर झाला आहे.

Hyderabad Cyber Fraud: हैदराबादमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पोलिसांनी चीनी हस्तकांचा समावेश असलेल्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. गुन्हेगारांनी एका वर्षाच्या आत किमान 15,000 भारतीयांची 700 कोटी रुपयांहून अधिकची फसवणूक केली आहे. हे पैसे दुबईमार्गे चीनला पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यातील काही रक्कम लेबनॉनस्थित दहशतवादी गट हिजबुल्लाहच्या खात्यावरही पाठवण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर क्राईम पोलिसांनी हैदराबाद येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराने म्हटले की, 'रेटिंग्स आणि रिव्ह्यू'साठी मेसेजिंग अॅपद्वारे त्याला पार्ट टाईम नोकरीची ऑफर देण्यात आली होती. ही ऑफर खरी असल्याचे मानत त्याने वेबसाइटवर रजिस्ट्रेशन केले आणि फसवणुकीचा बळी ठरला. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या व्यक्तींपैकी एकाचा संबंध काही चिनी नागरिकांशी आहे. तो भारतीय बँक खात्यांची माहिती सामायिक करुन त्यांच्याशी समन्वय साधतो आणि रिमोट ऍक्सेस अॅप्सद्वारे ही खाती दुबई-चीनमधून ऑपरेट करण्यासाठी OTP शेअर करतो.

हैदराबादचे पोलिस आयुक्त सीव्ही आनंद यांनी मीडियाला सांगितले की, या संदर्भात केंद्रीय एजन्सींना सतर्क केले असून, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सायबर क्राईम युनिटलाही तपशील देण्यात आला आहे. हे अत्यंत धक्कादायक आणि चकीत करणारे प्रकर आहे, कारण यात उच्च पगार असलेल्या सॉफ्टवेअर व्यावसायिकांनाही 82 लाख रुपयांचा चुना लावण्यात आलाय. पोलिसांना संशय आहे की, पैशाचा काही भाग क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतरित केला गेला आणि हिजबुल्लाद्वारे चालवल्या जाणार्‍या वॉलेटमध्ये जमा केला. 

या प्रकरणात नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. चार हैदराबाद, तीन मुंबई आणि दोन अहमदाबादमधून अटक झाली आहे. पोलीस अजून किमान सहा जणांचा शोध घेत आहेत. हैदराबाद पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने एप्रिलमध्ये एका व्यक्तीशी संपर्क साधल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला. आपली 28 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे पीडितेने सांगितले होते. गुंतवणुकीसह पार्ट टाईम नोकरीचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करण्यात आली आहे. पोलिसांना शेल कंपन्यांच्या नावाने 48 बँक खाती तयार झाल्याचे आढळून आले. या घोटाळ्यात एकूण 113 भारतीय बँक खाती वापरण्यात आली होती.

टॅग्स :fraudधोकेबाजीhyderabad-pcहैदराबादcyber crimeसायबर क्राइमchinaचीनterroristदहशतवादी