शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

देवदूत : कोरोनावर घरच्या घरी मात अन् त्यासाठी Fee फक्त १० रुपये, डॉ. व्हिक्टर इमॅन्युएल यांची सर्वत्र चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 15:54 IST

Hyderabad based doctor Victor Emmanuel treating COVID patients with just Rs 10 fee in Telangana  ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता, ऑक्सिजन संचांचा तुटवडा, रुग्णांसाठी नातेवाईकांना बेड्स मिळवण्यासाठी करावी लागणारी धावपळ, उपचारातून रुग्ण बरा झाल्यानंतर त्याच्यासमोर हॉस्पिटलकडून दिलं जाणारं भरमसाठ रक्कमेचं बिल... या सर्व परिस्थितीच्या विळख्यात सामान्य माणून अडकला आहे.

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण केला आहे. ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता, ऑक्सिजन संचांचा तुटवडा, रुग्णांसाठी नातेवाईकांना बेड्स मिळवण्यासाठी करावी लागणारी धावपळ, उपचारातून रुग्ण बरा झाल्यानंतर त्याच्यासमोर हॉस्पिटलकडून दिलं जाणारं भरमसाठ रक्कमेचं बिल... या सर्व परिस्थितीच्या विळख्यात सामान्य माणून अडकला आहे. व्हायरसमुळे अजूनही लॉकडाऊनचे नियम कायम ठेवण्यात आले असल्यानं अनेकांना नोकरी गमवावी लागली आहे. त्यात कोरोना झालाच तरी भरमसाठ येणाऱ्या बिलामुळे अनेकजण उपचार घेण्यासही टाळाटाळ करत आहे. पण, अशात तेलंगणा येथील डॉक्टर व्हिक्टर इमॅन्युएल हे फक्त १० रुपणे फी घेऊन कोरोनावर मात करण्यासाठी रुग्णांना मदत करत आहेत. ( Hyderabad: Doctor helps patients beat Covid-19 at home, with just Rs 10 fee) 

भारतात मागील २४ तासांत १ लाख ५२,७३४ कोरोना रुग्ण आढळले, तर २ लाख ३८,०२२ रुग्ण बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयानं सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील २४ तासांत ३१२८ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या एकूण २ कोटी ८० लाख ४७,५३४ इतकी झाली असून त्यापैकी २ कोटी ५६ लाख ९२, ३४२ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ३ लाख २९,१०० रुग्णांचे प्राण गेले आहेत. देशात सध्या २० लाख २६,०९२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  २१ कोटी, ३१ लाख ५४,१२९ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. मागील ५० दिवसांतील ही कोरोना रुग्णांची एका दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट हा ९१.६०% इतका आहे.  

बोदुप्पल येथे डॉक्टर इमॅन्यूएल यांचे प्रज्वल क्लिनिक आहे आणि ते general physician आहेत. त्यांच्या क्लिनिकबाहेर कोरोना रुग्णांची नेहमी गर्दी असते आणि फक्त १० रुपये फी घेऊन ते त्यांना मार्गदर्शन करत आहेत. ''गरजूंना मदत करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. लॉकडाऊनमुळे अनेकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. मी १० रुपये कन्सल्टंट फी घेतो. काहींना मोफतही उपचार देत आहोत. मागील वर्षांपासून आम्ही जवळपास २० ते २५ हजार कोरोना रुग्णांवर उपचार केले,''असे डॉक्टर इमॅन्युएल यांनी सांगितले.  कमलाम्मा या बोधुप्पल येथे राहणाऱ्या ६५ महिलेनं डॉक्टर व्हिक्टर इमॅन्युएल यांचे आभार मानले. कोरोना झाल्यानंतर ते घरी विलगिकरणात होते. ''माझ्यासाठी डॉक्टर साहेब हे देवच आहेत आणि त्यांच्या औषधांमुळे एका आठवड्यात मी कोरोनावर मात केली. मला फक्त ४० हजार रुपये खर्च करावा लागला आणि तो परवडणारा खर्च आहे,''असे कमलाम्माचे पती के यदागरी यांनी सांगितले. 

केंद्रीय कर्मचारी पी जानकी राम यांच्या कुटुंबीयातील ७ जणांना कोरोना झाला होता आणि त्यांना उपचारासाठी फक्त १० हजार रुपये खर्च आला. डॉ. इमॅन्युएल यांच्या मार्गदर्शनाखाली हे सातही सदस्य घरी विलगिकरणात होते आणि त्यांनी दिलेल्या सल्लानं उपचार घेत होते. ''जर आम्ही कोणत्याही खाजगी हॉस्पिटलमध्ये गेलो असतो तर बिल २५ लाखांच्या घरात झाले असते,''असे जानकी राम यांनी सांगितले.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTelanganaतेलंगणा