शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रीम कोर्टात होणार ‘हायब्रीड प्रत्यक्ष’ सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 06:06 IST

मार्गदर्शक तत्वे जाहीर; दोन दिवस होणार सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोविड-१९ साथीमुळे गेल्या वर्षी मार्चपासून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी घेणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाने येत्या १५ मार्चपासून ‘हायब्रीड प्रत्यक्ष’ सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची ‘मानक परिचालन पद्धती’ (एसओपी) सर्वोच्च न्यायालयाने जारी केली आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणारी सुनावणी बंद करून प्रत्यक्ष सुनावणी तत्काळ सुरू करण्याची मागणी वकील आणि त्यांच्या संघटनांकडून सातत्याने करण्यात येत होती. सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या एसओपीनुसार, सध्या मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या दिवशी प्रायोगिक तत्त्वावर हायब्रीड पद्धतीने सुनावणी घेतली जाऊ शकेल. त्यात अंतिम सुनावणी आणि नियमित प्रकरणांचा समावेश असेल. सोमवार आणि शुक्रवार या दिवशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अथवा टेली-कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेतली जाईल.

कोविड-१९ नियमावलीनुसार एका न्यायदालनात २० पेक्षा अधिक व्यक्तींना प्रवेश देता येत नाही. त्यामुळे ज्या प्रकरणांत नियमापेक्षा अधिक वकील आहेत, ती प्रकरणे न्यायालय निर्णय देत नाही तोपर्यंत व्हिडिओ अथवा टेली-कॉन्फरन्सिंग सुनावणीसाठीच सूचिबद्ध होतील. तथापि, अशा प्रकरणांत हायब्रीड पद्धतीने सुनावणी घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले असतील, तर न्यायालयाच्या सूचनेनुसार पक्षकारांना प्रत्यक्ष अथवा व्हिडिओ व टेली-कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी करून घेतले जाईल.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा पर्याय निवडला   n एसओपीमध्ये म्हटले आहे की, नियमित संख्येपेक्षा जास्त पक्षकार असलेल्या ज्या प्रकरणांत हायब्रीड सुनावणी होईल, त्या प्रकरणांतील प्रत्येक पक्षकाराचा एक ॲडव्होकेट-ऑन-रेकॉर्ड (एओआर) आणि एक युक्तिवादकर्ता वकील यांना न्यायालयात प्रवेश दिला जाईल. n प्रत्येक पक्षकाराच्या एका नोंदणीकृत लिपिकास (जो एओआरने निवडलेला असू शकतो) कागदपत्रे वाहून नेण्यासाठी प्रवेश दिला जाईल. हायब्रीड सुनावणी होत असलेल्या प्रकरणांत पक्षकाराचे सर्व वकील प्रत्यक्ष अथवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याचा पर्याय निवडू शकतील. कोणता पर्याय निवडला गेला हे एओआर न्यायालयास सांगतील. साप्ताहिक सुनावणी यादी जाहीर झाल्यानंतर २४ तासांच्या आत दुसऱ्या दिवशी १ वाजेपर्यंत पर्याय सादर करणे त्यांना बंधनकारक असेल. एओआरने पर्याय सादर केला नसेल, तर त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा पर्याय निवडला असे गृहीत धरले जाईल.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्या