पत्नीस ठार मारण्याचा प्रयत्न पतीस सक्तमजुरी
By admin | Updated: August 8, 2015 00:23 IST
इंदिरानगर येथील २०१४ ची घटना
पत्नीस ठार मारण्याचा प्रयत्न पतीस सक्तमजुरी
इंदिरानगर येथील २०१४ ची घटनानाशिक : पत्नीवर कोयत्याने वार करून गळा दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणार्या पतीस जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल खडसे यांनी पाच वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे़ चेतनानगर येथील म्हाडा कॉलनीत गतवर्षी ही घटना घडली होती़या खटल्याबाबत अधिक माहिती अशी की, म्हाडा कॉलनीतील रहिवासी दिलीप प्रल्हाद पहाडे याने १३ ऑक्टोबर २०१४ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास रागाच्या भरात पत्नी अनिता दिलीप पहाडे हिच्यावर कोयत्याने वार केले़ यानंतर पत्नीचा गळा दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला़ याबाबत पत्नीने इंदिरानगर पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता़ हा खटला जिल्हा न्यायालयात सुरू होता़ यामध्ये सरकारी वकील गायत्री पटणाला यांनी पाच साक्षीदार तपासून आरोपीविरुद्ध सबळ पुरावे सादर केले़ न्यायालयात साक्षीदारांमधील १२ वर्षीय मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली़ त्यानुसार आरोपी दिलीप पहाडे यास पाच वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे़(प्रतिनिधी)