शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्यार तूने क्या किया! करवाचौथला घरी नव्हता नवरा; बायकोने बॉयफ्रेंडसोबत केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 14:54 IST

एका विवाहित महिलेने बॉयफ्रेंडशी लग्न केलं. पती घरी उपस्थित नसताना तिने लग्न केलं.

देशभरात करवाचौथचा सण साजरा केला जात होता. विवाहित महिला आपल्या पतीसाठी करवाचौथचं व्रत ठेवतात. याच दरम्यान उत्तर प्रदेशातील मऊमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेने बॉयफ्रेंडशी लग्न केलं. पती घरी उपस्थित नसताना तिने लग्न केलं. लोकांनी या लग्नाचा व्हिडीओही बनवला जो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. 

करवाचौथच्या दिवशी गौरीशंकर मंदिरात हे लग्न करण्यात आलं. आश्चर्याची बाब म्हणजे या महिलेचे आधीच लग्न झालं होतं. असं असतानाही तिने तिच्या बॉयफ्रेंडशी आता दुसरं लग्न केलं. नवऱ्याला याबाबत समजताच तो घरी आला. त्याने पत्नीला जाब विचारला. यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. गोंधळ वाढताच पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी दोघांना पोलीस ठाण्यात बोलावलं.

पत्नीने बॉयफ्रेंडसह पोलीस ठाणं गाठलं. पण नवरा पोहोचला नाही. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रमिला नावाच्या तरुणीचं लग्न आकाशसोबत झालं होतं. पण प्रमिलाचा आधीच एक बॉयफ्रेंड होता, ज्याचं नाव विजय शंकर आहे. लग्नानंतरही प्रमिला आणि विजयचं अफेअर सुरूच होतं.

१० दिवसांपूर्वीच प्रमिलाने आकाशला सोडून विजय शंकरसोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. ती त्याच्यासोबत पळून गेली. पण दोन्ही कुटुंबीयांनी समजवल्यानंतर ती नवऱ्याकडे परत आली. यानंतर आकाश काही कामानिमित्त शहराबाहेर गेला होता. तो २० ऑक्टोबर आला, म्हणजेच करवाचौथच्या दिवशी आला. तेव्हा घरात कोणीच नव्हतं, हिच संधी साधून प्रमिलाने पुन्हा विजयसोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला.

गौरीशंकर मंदिरात प्रमिला आणि विजय यांचं लग्न झालं. यावेळी अनेक लोक तेथे जमा झाले. याची माहिती आकाशला मिळताच तो रात्री पोलिसांसह प्रमिलाच्या घरी पोहोचला. मात्र दोन्हीकडच्या लोकांमध्ये हाणामारी झाल्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

टॅग्स :marriageलग्न