शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

कडक सॅल्यूट! 1 लाख हुंड्यासाठी सासरच्यांनी घराबाहेर काढलं, सुनेने कष्टाने उभारला 60 लाखांचा व्यवसाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 11:27 IST

हुंड्यासाठी सुनेला घराबाहेर काढणाऱ्या सासरच्या मंडळींना सुनेने स्वत:च्या आपल्या मेहनतीच्या जोरावर चांगलाच धडा शिकवला आहे. तिने स्वत:च्या हिमतीवर 60 लाखांचा व्यवसाय उभा करून स्वत:ला सिद्ध केलं.

नवी दिल्ली - प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करता येतात. अशीच एक कौतुकास्पद घटना आता समोर आली आहे. हुंड्यासाठी सुनेला घराबाहेर काढणाऱ्या सासरच्या मंडळींना सुनेने आपल्या मेहनतीच्या जोरावर चांगलाच धडा शिकवला आहे. तिने स्वत:च्या हिमतीवर 60 लाखांचा व्यवसाय उभा करून स्वत:ला सिद्ध केलं आहे. झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्याच्या घाटशिलात राहणाऱ्या मधुमिता साव या महिलेला  हुंड्यासाठी त्रास सहन करावा लागला. मात्र यातूनच ती थांबली नाही तर उभं राहिली. 

स्वत:तर स्वावलंबी झालीच याशिवाय अन्य महिलांनाही स्वत:च्या पायावर उभं राहायला मदत केली. लग्नाच्या सहा महिन्यानंतर महिलेकडून एक लाखांचा हुंडा मागितला जात होता. 1 लाख दिले नाही म्हणून सासरच्या मंडळींनी तिला घराबाहेर काढलं. मात्र तरीही ती घाबरली नाही. तर घराबाहेर पडून स्वत:चा व्यवसाय उभा केला आणि आज कंपनी उभी केली असून 200 महिलांना रोजगार दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घाटशिला येथे राहणारी मधुमिता साव हिचं लग्न 2012 मध्ये झालं होतं. मात्र सासरच्यांनी केलेल्या छळामुळे सहा महिन्याच्या आत ती सासरी सोडून घरी परतली. 

कंपनीत 200 महिलांना रोजगार मिळाला

पहिल्यांदा तर मधुमिताला लोकांचे टोमणे ऐकावे लागले. पतीला सोडून घरी बसली म्हणून शेजारपाजारचे तिला ऐकवत होते. मात्र तरीही मधुमिताने हिंमत सोडली नाही. ती जमशेदपूरच्या एका फर्निचरच्या दुकानातून काम शिकत होती. पाच वर्षांपर्यंत फर्निचरच्या दुकानात काम केल्यानंतर तिने वूड क्राफ्टचं काम सुरू केलं. पीपल ट्री कंपनी नावाने 2016 मध्ये तिने रजिस्ट्रेशन केलं. सुरुवातील फार महिला नव्हत्या, मात्र आज पीपल ट्री कंपनीत 200 महिलांना रोजगार मिळाला आहे. 

पीपल ट्री कंपनीचं वार्षिक उत्पन्न 60 लाखांपर्यंत 

सद्यपरिस्थितीत मधुमिता सांगते की, तिचे सध्या 9 दुकानं आहेत. पीपल ट्री कंपनीचं वार्षिक उत्पन्न 60 लाखांपर्यंत आहे. सध्या ती करीत असलेल्या कामाचा अभिमान असल्याचं मधुमिता सांगते. वूड क्राफ्टच्या सामानाची किंमत ही 50 रुपये ते 5 हजार रुपयांपर्यंत आहे. आपल्या सोबत इतर महिलांना घेऊन त्यांनाही आर्थिकदृष्ट्या सक्षम केल्याचा प्रचंड आनंद आहे. सध्या आपल्यासोबत तब्बल 200 महिला काम करत असल्याचं मधुमिताने सांगितलं आहे. मधुमिताच्या कामाचं सर्वत्र भरभरून कौतुक केलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.