शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

गर्भ पाडण्यास वडिलांचा मुलीवर दबाव, नकार दिल्यानं डोळ्यांदेखत पतीची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 14:14 IST

माणुसकीला काळीमा फासणारी आणि मन हादरवणारी घटना तेलंगणामध्ये घडली आहे. गरोदर महिलेसमोरच तिच्या पतीची हत्या करण्यात आली.

नवी दिल्ली -  माणुसकीला काळीमा फासणारी आणि मन हादरवणारी घटना तेलंगणामध्ये घडली आहे. समाजातील आपला मान कायम राहावा, यासाठी एका पित्यानं आपल्या भावासोबत मिळून स्वतःच्याच मुलीच्या पतीची निर्घृण हत्या केली आहे. तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आहे. कुऱ्हाडीनं वार करुन प्रणय कुमार (वय 23 वर्ष)ची निर्घृण हत्या करण्यात आली. वडील-काकाने मिळून पतीची हत्या केली, असा आरोप प्रणयची पत्नी अमृता वार्षिणीने केला आहे. दरम्यान, या हत्येचा निषेध नोंदवण्यासाठी मिरयालगुडा परिसरात बंद पुकारण्यात आला आहे.  

या कारणासाठी केली प्रणय कुमारची हत्याप्रणय आणि अमृता वार्षिणी (वय 21 वर्ष) या दोघांनी आंतरजातीय विवाह केला. प्रणय हा खालच्या जातीतील मुलगा असल्यानं अमृताच्या कुटुंबीयांच्या त्यांच्या लग्नाला विरोध होता. मात्र, या दोघांनीही कुटुंबीयांचा विरोध झुगारुन आपला संसार थाटला. या लग्नामुळे अमृताचे कुटुंबीय प्रचंड नाराज झाले होते. मुलीनं आपल्या मनाविरोधात लग्न केल्याचा राग त्यांच्या मनात होता. 

यादरम्यान, अमृता गरोदर असल्याची माहिती तिच्या नातेवाईकांना समजली. तिनं मुलाला जन्म देऊ नये, यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता. मात्र तिनं वडील आणि काकाचा दबाव झुगारुन मुल वाढवण्यावर अमृता ठाम होती. आधीच आंतरजातीय विवाह केल्याचा राग अमृताच्या कुटुंबीयांच्या मनात होताच,  त्यात प्रणयपासून तिला दिवस गेले होते.  या सगळ्याचा राग काढण्यासाठी अमृताच्या कुटुंबीयांनी प्रणयलाच संपवण्याचा कट रचला.

नियमित तपासणीकरिता प्रणय अमृताला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला होता. काम आटोपल्यावर दोघंही हॉस्पिटलमधून बाहेर आले, त्यावेळेस मागील बाजूनं प्रणयवर कुऱ्हाडीनं सपासप वार करण्यात आले. एका मागून एक वार करण्यात आल्यानं प्रणयचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. 

आपल्या डोळ्यांदेखत झालेली पतीची हत्या पाहून अमृता बेशुद्धच पडली. तिला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. शुद्ध आल्यानंतर तिनं वडील आणि काकानं मिळून पतीची हत्या केल्याचा आरोप केला. तिनं केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनTelanganaतेलंगणा