शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पतीने केली पत्नीच्या कौमार्य चाचणीची मागणी; कोर्ट म्हणाले, हे विनयशीलतेच्या विरोधात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 05:45 IST

Court News: कोणत्याही महिलेला कौमार्य चाचणी करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही कारण असे करणे संविधानाच्या कलम २१चे उल्लंघन करते. याचिकाकर्त्याची मागणी असंवैधानिक आहे, असे छत्तीसगड उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

बिलासपूर - कोणत्याही महिलेला कौमार्य चाचणी करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही कारण असे करणे संविधानाच्या कलम २१चे उल्लंघन करते. याचिकाकर्त्याची मागणी असंवैधानिक आहे, असे छत्तीसगड उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

पत्नीचे अनैतिक संबंध आहेत, हे सिद्ध करण्यासाठी तिची कौमार्य चाचणी करण्याची मागणी पतीने याचिकेद्वारे केली. त्याला उत्तर देताना न्या. अरविंद कुमार वर्मा म्हणाले, कौमार्य चाचणीला परवानगी देणे मूलभूत अधिकार, नैसर्गिक न्यायाच्या मूलभूत तत्त्वांच्या व महिलेच्या विनयशीलतेच्या विरोधात असेल.

काय प्रकरण आहे?कौटुंबिक न्यायालयाने १५ ऑक्टोबर २०२४ रोजी दिलेल्या आदेशाला त्या व्यक्तीने आव्हान दिले होते. या जोडप्याचे २०२३ मध्ये लग्न झाले. पत्नीने तिच्या कुटुंबातील सदस्यांना सांगितले की, तिचा पती नपुंसक आहे आणि त्याने वैवाहिक संबंध ठेवण्यास नकार दिला. तिने तिच्या पतीकडून २०,००० रुपयांच्या पोटगीचीमागणी केली.याचिकाकर्त्याने त्याच्या पत्नीची कौमार्य चाचणी करण्याची मागणी केली आणि त्याच्या पत्नीचे तिच्या मेहुण्यासोबत अवैध संबंध असल्याचा आरोप केला.

‘नपुंसकता चाचणी करा’न्यायालयाने त्या याचिकाकर्त्याला सांगितले की, नपुंसकत्वाचे आरोप निराधार आहेत हे सिद्ध करण्यासाठी तो वैद्यकीय चाचणी करून घेऊ शकतो.  त्याला त्याच्या पुराव्यांमधील उणिवा भरून काढण्याची परवानगी देता येणार नाही.

न्यायालयाने काय म्हटले?उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, याचिकाकर्त्याची मागणी असंवैधानिक आहे कारण ती संविधानाच्या कलम २१ चे उल्लंघन करते, ज्यामध्ये महिलांच्या सन्मानाच्या अधिकाराचा समावेश आहे. भारतीय राज्यघटनेचे कलम २१ केवळ जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकाराची हमी देत नाही तर सन्मानाने जगण्याचा अधिकारदेखील देते, जे महिलांसाठी महत्त्वाचे आहे. ‘कोणत्याही महिलेला कौमार्य चाचणी करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही.’ असेही न्यायालयाने म्हटले आहे. 

 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपCourtन्यायालय