शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या प्रेमात वेडावलेल्या पतीनं धरली ११ हजार हाय व्होल्टेज विजेची तार; दोन्ही हात गमावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 20:47 IST

पतीला सासरी परत आणण्यासाठी तिच्या माहेरी गेलेल्या पतीनं गमावले दोन्ही हात

शामली: माहेरी गेलेल्या पत्नीनं घरी परतावं यासाठी तिची समजूत काढायला गेलेल्या पतीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. पत्नीच्या प्रेमात वेडा झालेला पती तिचं मन वळवण्यासाठी माहेरी पोहोचला. पत्नीच्या सांगण्यावरून त्यानं ११ हजार हाय व्होल्टेजचा विद्युत प्रवाह असलेली तार  हाती धरली. सुदैवानं त्याचा जीव वाचला. मात्र त्याला दोन्ही हात गमवावे लागले. नदीम असं या इसमाचं नाव आहे. आता त्याच्या पत्नीचे कुटुंबीय तिला सासरी पाठवण्यास तयार नाहीत. उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील कैरानामध्ये हा प्रकार घडला आहे. 

कैरानातील नदीमचं कांधलामध्ये वास्तव्यास असलेल्या सायमासोबत सात वर्षांपूर्वी सूत जुळलं. गेल्या वर्षी त्यांचा निकाह संपन्न झाला. काही दिवसांपूर्वी सायमा नदीमला सोडून माहेरी आली. नदीमनं तिला घरी परत येण्याची विनंती केली. मात्र तिनं नदीमची परीक्षा घेण्यास सुरुवात केली. 

तू माझ्यासाठी काय करू शकतो अशी विचारणा सायमानं नदीमकडे केली. त्यावर मी तुझ्यासाठी जीवदेखील देऊ शकतो असं उत्तर त्यानं दिलं. त्यानंतर सायमानं नदीमला ११ हजार व्होल्टेजचा विद्युत प्रवाह असलेली तार पकडण्यास सांगितली. पत्नीच्या प्रेमात वेडावलेल्या नदीमनं विजेची तार पकडली आणि त्याला जबरदस्त शॉक लागला. नदीमचा जीव वाचला असला तरीही त्यानं दोन्ही हात गमावले.

आता सायमचे कुटुंबीय आणि नातेवाईक तिला नदीमसोबत पाठवण्यास तयार नाहीत. त्यामुळे नदीमनं पत्नीला पुन्हा सासरी आणण्यासाठी पोलिसांकडे मदत मागितली. सासरची मंडळी मारहाण आणि शिवीगाळ करत असल्याचा आरोप करणारा अर्ज त्यानं पोलीस अधीक्षकांना दिला. 'माझं माझ्यावर पत्नीवर नितांत प्रेम आहे. तिचा चेहरा बघून मी माझं संपूर्ण आयुष्य काढेन,' असं नदीमनं पोलिसांना दिलेल्या अर्जात म्हटलं आहे.