शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पतीचे कॉल, हॉटेल रूम बुकिंग डिटेल्स, मागणे गोपनीयतेचे उल्लंघन नव्हे : कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 09:04 IST

व्यभिचाराच्या  कारणावरून   एका महिलेने घटस्फोटाचा अर्ज  दाखल केला  होता.

डॉ. खुशालचंद बाहेती

नवी दिल्ली : व्यभिचार सिद्ध करण्यासाठी पतीचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड आणि हॉटेल रूम बुकिंगच्या तपशिलांची मागणी करणे हे गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन ठरत नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

‘पटोलेंनी राजीनामा द्यायलाच नको होता’; दादा-नानांत जुंपली

व्यभिचाराच्या  कारणावरून   एका महिलेने घटस्फोटाचा अर्ज  दाखल केला  होता. आपला पती दुसरी महिला आणि तिच्या मुलीसोबत हॉटेलमध्ये थांबला होता, असा तिचा आरोप होता. पुरावा म्हणून पतीचा  सीडीआर आणि हॉटेलचे रेकॉर्ड मिळण्यासाठी तिने  कौटुंबिक न्यायालयात दिलेला अर्ज  मंजूर झाला. 

कोर्टाने रेकॉर्ड मागवले. याला  हायकोर्टात आव्हान देण्यात आले. पतीचे  म्हणणे होते की, हे त्याच्या  गोपनीयतेच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे. शिवाय यामुळे  हॉटेलमध्ये योगायोगाने भेटलेल्या महिलेच्या प्रतिष्ठेवर आणि चारित्र्यावरच गंभीर प्रश्न निर्माण होईल. इतकेच नव्हे तर त्या महिलेच्या अल्पवयीन मुलाच्या पितृत्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण होईल.

तथापि, उच्च न्यायालय म्हणाले की, व्यभिचाराचा थेट पुरावा क्वचितच उपलब्ध होतो. व्यभिचार सिद्ध करण्यासाठी ही माहिती निश्चितपणे उपयुक्त  ठरेल. पेमेंट आणि बुकिंगचे  तपशील, खोलीतील रहिवाशांचे ओळखपत्र या महत्त्वपूर्ण मुद्द्यावर नक्कीच प्रकाश टाकतील की, पती खरोखरच एका महिलेसोबत राहत होता की नाही. त्याचप्रमाणे, सीडीआरवरून  हे समजेल की, पतीचे महिलेसोबतचे संभाषण दीर्घकाळ, वारंवार आणि   सामान्य  सहकाऱ्यांमध्ये अपेक्षित नसलेल्या वेळेस होत होते काय?

हिंदू विवाह कायदा व्यभिचाराला घटस्फोटाचे कारण म्हणून मान्यता देतो आणि म्हणूनच, न्यायालयाने गोपनीयतेच्या अधिकाराच्या नावाखाली विवाहबाह्य संबंधाचा आरोप असणाऱ्या विवाहित पुरुषाच्या मदतीला यावे, हे सार्वजनिक हिताचे नाही. गोपनीयतेचा अधिकार हा सार्वजनिक हितासाठी  वाजवी निर्बंधांच्या अधीन आहे.

              - रेखा पल्ली, न्यायमूर्ती

टॅग्स :Courtन्यायालय