शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक ! खेळता-खेळता बसला फास, लहानग्याने गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 15:47 IST

गुरूवारी संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास तो शिकवणीवरून घरी परतला. त्यावेळी त्याची आई आणि दोन्ही बहिणी घराच्या दुस-या मजल्यावर होत्या आणि तो तळमजल्यावर खेळत होता.

दिल्ली - सातवीच्या एका विद्यार्थ्याचा गळ्याला फास बसल्याने मृत्यू झाल्याची मन हेलवणारी घटना घडली आहे. मृत्यूमुखी पडलेला लहानगा घरात खेळत असताना ही दुर्दैवी घटना घडली. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील चौकशी करत आहेत. राजधानी दिल्लीच्या नंदनगरी परिसरातील ही घटना आहे. मिठाईचं दुकान असलेले पुरूषोत्तम आपली पत्नी,मुलगा आणि दोन मुलींसह राहतात. त्यांचा 14 वर्षांचा मुलगा सातवीतला विद्यार्थी होता. 

गुरूवारी संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास तो शिकवणीवरून घरी परतला. त्यावेळी त्याची आई आणि दोन्ही बहिणी घराच्या दुस-या मजल्यावर होत्या आणि तो तळमजल्यावर खेळत होता. थोड्यावेळानंतर आई आणि बहिणी खाली आल्या आणि त्यांना जबर धक्का बसला. मुलगा फासावर लटकल्याचं पाहून त्यांच्या  पायाखालची जमीन सरकली. त्याच्याजवळ एक स्टूल पडला होता. 'आज तक'ने याबाबत वृत्त दिलं आहे. 

घरात खेळत-खेळता तो स्टूलवर उभा राहिला आणि पंख्याच्या पात्यांवर त्याने ओढणी टाकली. त्या दरम्यानच त्याला फास बसला आणि पायाखालचा स्टूल सटकला अशी शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनानंतर कुटुंबियांकडे मृतदेह सोपवला आहे. मात्र, पोलीस अजूनही या घटनेची चौकशी करत आहेत.