बुलबुल चक्रीवादळाचा ओडिशाच्या किनारपट्टीला तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 03:36 AM2019-11-10T03:36:24+5:302019-11-10T03:36:28+5:30

बुलबुल चक्रीवादळाच्या तडाख्याने ओडिशाच्या किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी शनिवारी मुसळधार पाऊस पडला.

Hurricane hits Odisha | बुलबुल चक्रीवादळाचा ओडिशाच्या किनारपट्टीला तडाखा

बुलबुल चक्रीवादळाचा ओडिशाच्या किनारपट्टीला तडाखा

Next

भुवनेश्वर : बुलबुल चक्रीवादळाच्या तडाख्याने ओडिशाच्या किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी शनिवारी मुसळधार पाऊस पडला. या नैसर्गिक आपत्तीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
ओडिशातील जगतसिंगपूर, केंद्रपारा, भद्रक जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळामुळे झाडे, वीजेचे खांब कोसळले असून त्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण झाले तसेच वीजपुरवठा खंडित झाला आहे. या राज्याचे मुख्य सचिव असित त्रिपाठी यांनी सांगितले की, वादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर सरकारचे बारीक लक्ष असून मदतकार्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. कोसळलेली झाडे रस्त्यांतून बाजूला सारण्याचे काम राष्ट्रीय आपत्ती निवारण दल व ओडिशा आपत्ती निवारण धडक कृती दलाने हाती घेतले आहे. वादळामुळे केंद्रपारा जिल्ह्यातील राजनगर भागात शुक्रवारपासून १८० मिमी तर चांदबाली भागात १५० मिमि व जगतसिंगपूर जिल्ह्यातील त्रितोल येथे १०० मिमी पाऊस पडला आहे. किनारपट्टीजवळच्या तीन हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Hurricane hits Odisha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.