शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

कर्नाटकात स्थिती त्रिशंकूच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 04:44 IST

कर्नाटक विधानसभेच्या २२२ जागांसाठी शनिवारी शांततेत पार पडलेल्या मतदानानंतर लगेचच विविध वृत्तवाहिन्यांनी केलेल्या मतदानोत्तर जनमत चाचण्यांचे निष्कर्षही जाहीर झाले असून

बंगळुरू : कर्नाटक विधानसभेच्या २२२ जागांसाठी शनिवारी शांततेत पार पडलेल्या मतदानानंतर लगेचच विविध वृत्तवाहिन्यांनी केलेल्या मतदानोत्तर जनमत चाचण्यांचे निष्कर्षही जाहीर झाले असून, त्यानुसार यंदा कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही आणि राजकीय स्थिती अस्थिर राहील, असे दिसत आहे. विधानसभा त्रिशंकू राहील, असे सर्व मतदानोत्तर चाचण्यांतून दिसून आल्याने काँग्रेस व भाजपाचे नेते भलतेच अस्वस्थ झाले आहेत.राज्यात सुमारे ७0 टक्के मतदान झाले. किरकोळ घटना वगळता सर्वत्र शांततेने मतदान पार पडले, एका मतदारसंघातील केवळ दोन बुथवर पुन्हा मतदान होणार आहे, असे निवडणूक आयोगातर्फे सांगण्यात आले. काही ठिकाणी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी महिलांना नाकात घालायच्या सोन्याच्या चमकी दिल्याच्या तक्रारी आल्या आहेत. शिवाय काँग्रेस व भाजपा कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ बाचाबाची झाल्याचेही वृत्त आहे. मात्र अशा प्रकारांमुळे मतदानाला कुठेही गालबोट लागले नाही.१५ मे रोजी मतमोजणीया सर्व २२२ मतदारसंघांत मंगळवार, १५ मे रोजी मतमोजणी होणार असून, त्या दिवशी दुपारपर्यंत सर्व निकाल हाती येतील, अशी अपेक्षा आहे. वृत्तवाहिन्यांनी निकालापर्यंत न थांबता मतदान संपल्यानंतर अवघ्या एका तासातच त्यांनी केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष सांगण्यास सुरुवात केली. या चाचण्यांचे जे निष्कर्ष आले आहेत, ते पाहता विधानसभेत कोणालाही स्पष्ट वा साधे बहुमतही मिळणार नाही. काँग्रेस वा भाजपा यांना जनता दलच्या मदतीशिवाय सरकारच स्थापन करता येणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.विश्वास ठेवायचा का?अर्थात मतदानोत्तर चाचण्यांवर पूर्ण विश्वास ठेवता येत नाही. बिहार व दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या वेळी या चाचण्यांचे निकाल सपशेल खोटे ठरले होते. कर्नाटकबाबतही विविध चाचण्यांचे निष्कर्ष वेगवेगळे आहेत. काहींनी काँग्रेसला तर काहींनी भाजपाला सर्वाधिक जागा दिल्या आहेत. एका वृत्तवाहिनीने दोन संस्थांमार्फत चाचण्या घेतल्या. त्यापैकी एकात काँग्रेसला तर दुसऱ्या चाचणीत भाजपाला सर्वाधिक जागा दिल्या.एकूण ९ मतदानोत्तर चाचण्यांचे आकडे (चौकटीत) वेगवेगळे आल्याने सर्व चाचण्यांतील आकड्यांची सरासरी काढली तर काँग्रेसला ९२, भाजपाला ९६ व जनता दलाला ३१ तर अन्य व अपक्ष यांना ३ जागा मिळतील, असे दिसते. अर्थात एका वृत्तवाहिनीने दोन चाचण्या घेतल्याने हे आकडे आले आहेत. त्या वाहिनीच्या दोन चाचण्यांमुळे दोन्ही पक्षांना झुकते माप मिळाले आहे.वृत्तवाहिन्यांचे अंदाजकाँग्रेस भाजपा जेडीएस अन्यन्यूज एक्स-सीएनएक्स ७२-७८ १०२-११० ३५-३९ ३-५न्यूज १८ लोकमत ९०-१०३ ८०-९३ ३१-३९ २-४एबीपी-सी व्होटर ८९-९९ ९७-१०९ २१-३० १-८रिपब्लिक टीव्ही ९५-११४ ७३-८२ ३२-४३ --सुवर्णा टीव्ही १०६-११८ ७९-९२ २२-३० १-४इंडिया टीव्ही १०६-११८ ७९-९२ २२-३० १-४टाइम्स नाऊ -व्हीएमआर ९० -१०३ ८०-९३ ३१ -३९ २-४टाइम्स नाऊ -चाणक्य ७३ १२० २६ ०३इंडिया टुडे १०६-११८ ७९-९२ २२-३० १-४

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८