शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

चंद्रावर शेकडो मोहिमा; कुतूहल काही संपेना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 06:41 IST

प्राचीन काळापासून चंद्राशी मानवाचे आगळेवेगळे नाते

भारताचे चंद्रयान-३ नुकतेच चंद्राच्या दिशेने झेपावले आणि जगभरात इस्रोचे कौतुक झाले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर नियोजित ठिकाणी चंद्रयान-३ चे यशस्वी लॅण्डिंग झाल्यास अशी कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरेल. दरम्यान, नासाच्या अपोलो ११ मोहिमेअंतर्गत २० जुलै १९६९ रोजी अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल टाकणारी पहिली व्यक्ती ठरला. त्यानिमित्त दरवर्षी २० जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय चंद्र दिन म्हणून साजरा केला जातो.

n  पृष्ठभाग हा खडकसदृश असून, पृष्ठभागाखालील भाग हा अन्य ग्रहांसारखा आहे. काही खडक हे पृथ्वीवरील प्राचीन खडकांपेक्षाही जुने आहेत.

n पृष्ठभाग हा सर्वच ठिकाणी एकसमान नसून काही ठिकाणी जाड, तर बहुतांश भाग हा बेसाॅल्ट खडकाचा आहे. खडकांची निर्मिती ही उच्च तापमानाच्या लाव्हारसातून झाली. पाण्याचा कुठलाही अंश नाही. मंगळ ग्रहाच्या तुलनेत वातावरण लॅण्डिंगसाठी कठीण आहे.

चंद्राचे महत्त्व

अगदी प्राचीन काळापासून चंद्राशी मानवाचे आगळेवेगळे नाते आहे. भाऊबीज, कोजगरी पौर्णिमा, बुद्ध पौर्णिमा, करवा चौथ, ईद आदी सणांच्यावेळी चंद्राचे विशेष महत्त्व आहे. पृथ्वीवरील भरती-ओहोटीचे गणितही सांभाळतो तो चंद्रच. एवढेच नव्हे, तर पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील हालचालींवरहीचंद्र परिणाम करत असल्याचे संशोधक म्हणतात. चंद्राबाबत अद्याप बरेच कुतूहल आहे. त्याच उद्देशाने विविध देशांच्या अवकाश संस्थांकडून चंद्राच्या मोहिमा राबविल्या जातात. 

इस्रोही मानवाला पाठविणार? अवकाशात मानवाला पाठविण्यासाठी इस्रोही तयारी करत आहे. ‘गगनयान - एच १’ या मोहिमेच्या माध्यमातून २०२४च्या अखेरीस मानवाला अवकाशात पाठविण्यात येणार आहे.

१४०+ आतापर्यंत चंद्रावर मोहिमा राबवण्यात आल्या. त्यापैकी नऊ मोहिमांमध्ये मानवाला चंद्रावर पाठवले होते.

चंद्रावर पाऊल ठेवलेल्या व्यक्ती

नील आर्मस्ट्राँग एडवीन एल्ड्रिन चार्ल्स कॉनरॅड ॲलन बीन ॲलन शेपर्ड एडगर मिशेल डेव्हिड स्कॉटजेम्स इर्विन जॉन यंग चार्ल्स ड्युक इजेन केर्नन हॅरिसन स्क्मिट

 

टॅग्स :Chandrayaan-3चांद्रयान-3Chandrayaan 2चांद्रयान-2