शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे फूट भुयार खणून करायचे पेट्रोलची चोरी! स्फोटानंतर प्रकार उघडकीस, पाइपलाइनला पाडले होते भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 01:24 IST

सूरज विहारमध्ये गेल्या मंगळवारी रात्री ९ वाजता स्फोटाच्या आवाजाने इमारती हादरल्या आणि रहिवासीही घाबरून गेले. स्फोटाची माहिती मिळताच पोलीसही तिथे तातडीने येऊन पोहोचले. तिथे त्यांना दिसला आठ फूट खोल खड्डा. पोलिसांनी त्या जागेची बारकाईने तपासणी केली, तेव्हा आढळलेला प्रकार धक्कादायक होता. तो खड्डा म्हणजे होते एक लांबलचक भुयार. इंडियन आॅइल कंपनीच्या पाइपलाइनमधून पेट्रोल चोरण्यासाठी हे भुयार शर्वलिकांनी खणले होते.

नवी दिल्ली : येथील सूरज विहारमध्ये गेल्या मंगळवारी रात्री ९ वाजता स्फोटाच्या आवाजाने इमारती हादरल्या आणि रहिवासीही घाबरून गेले. स्फोटाची माहिती मिळताच पोलीसही तिथे तातडीने येऊन पोहोचले. तिथे त्यांना दिसला आठ फूट खोल खड्डा. पोलिसांनी त्या जागेची बारकाईने तपासणी केली, तेव्हा आढळलेला प्रकार धक्कादायक होता. तो खड्डा म्हणजे होते एक लांबलचक भुयार. इंडियन आॅइल कंपनीच्या पाइपलाइनमधून पेट्रोल चोरण्यासाठी हे भुयार शर्वलिकांनी खणले होते.या भुयारामध्ये गॅसचा दाब वाढून स्फोट झाला होता. भुयार खणून पेट्रोल चोरण्याची शक्कल लढविणाºया चोरांचा म्होरक्या झुबैर याला पोलिसांनी अटक केली असून त्याचा भंगारविक्रीचा व्यवसाय आहे. त्याचा एक साथीदार मात्र पळून गेला. ही टोळी इंडियन आॅइलच्या पाइपलाइनमधून दर आठवड्याला तीन हजार लिटर पेट्रोल चोरत असे.या पाइपलाइनपर्यंत पोहोचण्यासाठी या चोरट्यांनी लढविलेली अफलातून शक्कल लढविली होती. त्यांनी जमिनीखाली १५० फूट लांबीचा व अडीच फूट रुंद असे भुयार खणले होते. हे भुयार जिथे संपत होते तिथे छोटीशी खोली बांधण्यात आली होती.तिथून पेट्रोलच्या पाइपलाइनला एक पाइप जोडून त्याला एक नळ बसविला होता. त्याद्वारे इंडियन आॅइलच्या पाइपलाइनमधून पेट्रोलची चोरी करून ते तीन पिंपांच्या टाक्यांमध्ये साठविले जात असे.या चोरलेल्या पेट्रोलमध्ये केरोसिनची भेसळ करून ते काळ््याबाजारामध्ये विकून ही टोळी धन कमवत असत.भंगाराच्या मागे भुयाराचे तोंड-झुबैरने या परिसरात भाड्याने घेतलेल्या जागेत भंगारचा व्यवसाय सुरू केला होता. बिजवासन येथून पानिपतपर्यंत जाणारी इंडियन आॅइलची पेट्रोल पाइपलाइन त्याच्याजवळूनच जाते, हे लक्षात येताच त्याने आणखी एक जागाही भाड्याने घेतली. त्यानंतर झुबैर व त्याच्या साथीदारांनी दिवस-रात्र एक करून या जमिनीत भुयार खोदले व भुयाराचे प्रवेशद्वार भंगाराआड दडविले. गेल्या आठवड्यात भुयार खणून पूर्ण होताच, त्यांनी पेट्रोलचोरीला सुरुवात केली होती; पण मंगळवारच्या स्फोटाने त्यांचे सारे पितळ उघडे पडले.

टॅग्स :Petrolपेट्रोलThiefचोर