राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दिल्ली येथे आयोजित 'संघ यात्रेची १०० वर्षे: नवे क्षितिज' या व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी, संघ प्रमुख मोहन भागवत यांनी पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्यांनी लोकसंख्या धोरणाबद्दलही भाष्य केले. 'हम दो हमारे तीन' हे धोरणे असली पाहिजे, असे विधान संघ प्रमुख मोहन भागवत यांनी केले.
मोहन भागवत म्हणाले, 'ज्यांचा जन्मदर ३ पेक्षा कमी आहे ते हळूहळू नामशेष होतात, असं जगातील सर्व धर्मग्रंथांमध्ये म्हटले आहे. डॉक्टर मला सांगतात की लग्नाला जास्त उशीर न केल्याने आणि ३ मुले झाल्याने पालक आणि मुलांचे आरोग्य चांगले राहते. भारतातील प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात ३ मुले असावीत याची खात्री करावी, असेही भागवत म्हणाले.
'डॉक्टर म्हणतात की तीन मुले असल्याने पालक निरोगी राहतात. मुले आपापसात अहंकाराचे व्यवस्थापन शिकतात आणि भांडणे होत नाहीत, असेही ते म्हणाले.
प्रत्येकाने विचार केला पाहिजे- मोहन भागवत
मोहन भागवत म्हणाले,'देशाची सरासरी २.१ आहे, गणितात असे घडते, परंतु मानवांमध्ये २.१ म्हणजे तीन. भारतातील प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात तीन मुले असण्याचा विचार करावा. पण तीन मुलांचा खर्चही करावा लागेल, अशा परिस्थितीत तीनपेक्षा जास्त मुले होऊ नयेत, हे सर्वांनी स्वीकारले पाहिजे.
सर्वांचा जन्मदर कमी होत आहे. हिंदूंचा जन्मदर आधीच कमी होता, आता तो आणखी कमी होत आहे. नवीन पिढीने तीनपेक्षा कमी मुले होऊ नयेत यासाठी तयार असले पाहिजे, असेही मोहन भागवत म्हणाले.