शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीनंतर बनावट नोटा; संशयास्पद व्यवहारांच्या प्रमाणात मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 09:25 IST

संशयास्पद व्यवहारांची संख्या चारपटीनं वाढली

नवी दिल्ली: नोटाबंदीनंतरच्या आर्थिक वर्षात देशभरातील बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस नोट्या जमा झाल्या आहेत. याआधी बँकांमध्ये कधीही इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट नोटा आल्या नव्हत्या. याशिवाय 2016-17 या आर्थिक वर्षात संशयास्पद व्यवहारांमध्ये तब्बल 480 टक्क्यांची वाढ झाली आहे. फायनान्शियन इन्टेलिजन्स युनिटच्या (एफआययू) अहवालातून ही बाब समोर आली आहे. वृत्तसंस्था पीटीआयनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. '2015-16 मध्ये 4.10 लाख बोगस नोटा आढळून आल्या होत्या. मात्र 2016-17 मध्ये यामध्ये मोठी वाढ झाली. या आर्थिक वर्षात नोटाबंदीनंतर 7.33 लाख बोगस नोटा आढळल्या', असे एफआययूनं अहवालात म्हटलं आहे. या अहवालात किती बोगस नोटा आढळून आल्या, त्याची आकडेवारी देण्यात आली आहे. मात्र या बोगस नोटांचे नेमकं मूल्य किती, याची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र अवघ्या वर्षभराच्या कालावधीत बँकेत जमा झालेल्या बनावट नोटांची संख्या तब्बल 3.23 लाखांनी वाढल्याचं या अहवालातील आकडेवारी सांगते. बनावट नोटांसोबतच बँकेमधून होणाऱ्या संशयास्पद व्यवहारांची संख्यादेखील वाढली आहे. सरकारी आणि खासगी बँकांमध्ये 2016-17 या आर्थिक वर्षात 4.73 लाख संशयास्पद व्यवहार झाले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व व्यवहार नोटाबंदीनंतर झाले आहेत. 2015-16 च्या तुलनेत 2016-17 या कालावधीत झालेल्या संशयास्पद व्यवहारांचं प्रमाण चौपट असल्याची आकडेवारी अहवालातून समोर आली आहे.  

टॅग्स :Demonetisationनिश्चलनीकरण