शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?
3
अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
4
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
5
"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!
6
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?
7
SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?
8
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
9
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
10
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
11
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
12
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
13
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
14
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
15
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
16
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
17
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
18
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
19
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
20
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेश; पाकिस्तानला लागणार मिरची..!

Hubli Violence: दिल्लीनंतर हुबळीमध्ये हिंसाचार, जमावाचा पोलीस ठाण्यावर हल्ला; 12 पोलीस जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 09:56 IST

Hubali Mob Attack: जमावाने पोलीस स्टेशनसह रुग्णालय आणि मंदिरावरही हल्ला केला. या पार्श्वभूमीवर हुबळीमधील जमावबंदी 20 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.

हुबळी: रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या दिवशी हिंसाचार झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता कर्नाटकातील हुबळीमध्येही हिंसाचार झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टवरुन जमावाने चक्क पोलीस ठाण्यावरच हल्ला(Mob Attack in Hubli Police Station) केला. यात 12 पोलीस कर्मचारी जखमी झाले.

मंदिर आणि रुग्णालयाची तोडफोडसोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे जमावाने अचानक हल्ला केला. यावेळी पोलीस ठाण्यासोबतच रुग्णालय आणि मंदिराचीही तोडफोड करण्यात आली. कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी हुबळी हिंसाचाराला ‘नियोजित कट’ म्हटले आहे. तसेच, कायदा हातात घेणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असा इशाराही दिलाय.

'हा अक्षम्य गुन्हा'- मुख्यमंत्री बोमईकर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र म्हणाले, हा पूर्वनियोजित हल्ला होता. हुबळीमध्ये देवरा जीवनहल्ली आणि कडूगोंडहल्ली सारख्या घटना घडवून आणायच्या होत्या. हुबळीमध्ये निर्माण झालेल्या जातीय तणावावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकार ते सहन करणार नाही. पोलिस कारवाई करत आहेत, कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास पोलीस मागेपुढे पाहणार नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली. 

हल्लेखोरांना सोडणार नाही-  पोलीसपोलिस अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, आरोपींचा धर्म कोणताही असो, हिंसाचारात सहभागी झालेल्या कोणाचीही गय केली जाणार नाही. सुरुवातीला सुनियोजित षडयंत्र म्हणून याकडे पाहिले जात आहे. या घटनेत 12 पोलीस जखमी झाले आहेत. एका तरुणाने व्हॉट्सअॅपवर वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याने हिंसाचार सुरू झाला. सध्या सुरक्षा दलांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. याप्रकरणी पोस्ट शेअर करणाऱ्यासह 40 जणांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकdelhi violenceदिल्लीPoliceपोलिस