शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! तब्बल 10 दिवस लेकीच्या कुजलेल्या मृतदेहाशेजारी बसून होती आई; नेमकं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 10:57 IST

10 दिवस आई ही आपल्या मुलीच्या कुजलेल्या मृतदेहासह जमिनीवर पडून राहिली होती.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमधील हावडामध्ये रविवारी अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हावडामधील शिबपूर  (Howrah Shibpur) भागात तब्बल 10 दिवस आई ही आपल्या मुलीच्या कुजलेल्या मृतदेहासह जमिनीवर पडून राहिली होती. रविवारी सकाळी या घटनेनंतर हावडा परिसरात खळबळ उडाली. याबाबत माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचं नाव श्यामली मलिक (45) असल्याचं समोर आलं आहे. तिची आई दीप्ती मलिक (60) आहे. वृद्ध महिला घरात आपल्या मुलीसह राहत होती. त्य़ा दोघेही गेल्या दोन महिन्यांपासून आजारी होते. घराजवळ त्यांचे नातेवाईक आहेत. मात्र कोणीच त्यांची विचारपूस केली नाही. घरात प्रवेश करताना घरभर दुर्गंधी पसरली होती. तर श्यामलीचा कुजलेला मृतदेह तिच्या आईशेजारी पडून होता. आई निश्चलपणे बसून होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी दिला.

वृद्ध महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिचा पती एका खासगी कंपनीत काम करत होता. तीन वर्षांपूर्वी त्याचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर तिची काळजी करणारं कोणीच नाही. श्यामली देवीचा पुतण्या शुभदीप कधी कधी घरी येत होता. तो कधी कधी जेवण घेऊन येत होता. रविवारी तो पुन्हा आला होता. मात्र दोघींवर उपचार का करण्यात आले नाही याबाबत काहीच माहिती तो देऊ शकला नाही. शुभदीपने हे मान्य केलं ही त्यांच्या आरोग्याबाबत दुर्लक्ष झालं आहे. निष्काळजीपणा झाल्याचं म्हटलं. 

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या दोघींपैकी कोणीच घराबाहेर जात नव्हते. कधी कधी त्यांचे नातेवाईक घरी येत होते. तेच जेवण घेऊन येत होते. तसं पाहता श्यामली देवीजवळ जमिनीचा तुकडा आहे. तिच्या मृत्यूनंतर ती जमिन नातेवाईकांना मिळणार होती. यामुळे कदाचित त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं असावं. हा सवाल उपस्थित केला जात आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.