नवी दिल्ली : लोकसभेत मान्यताप्राप्त विरोधी पक्षनेता नाही म्हणून लोकपाल व केंद्रीय दक्षता आयुक्तांसह विविध घटनात्मक पदांवरील नियुक्त्या अवैध ठरत नाहीत, असे मत अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी नोंदवले आहे़लोकपाल, सीव्हीसी, सीबीआय, केंद्रीय माहिती आयुक्त, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष व अन्य सदस्यांची निवड करणाऱ्या निवड समितीचा लोकसभेतील विरोधी पक्षनेता हा सदस्य असतो़ संपुआ अध्यक्ष सोनिया गांधी यांनी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना पत्र लिहून विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला देण्याची मागणी केली होती़ यानंतर लोकसभा सचिवालयाने या संदर्भात अॅटर्नी जनरल यांचे मत मागवले होते़ या पार्श्वभूमीवर वृत्तसंस्थेने माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज केला होता़ र्क)
...तरी लोकपाल नियुक्ती अवैध ठरत नाही -रोहतगी
By admin | Updated: November 17, 2014 03:06 IST