शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

फेसबुकचे त्रासदायक नोटिफिकेशन कसे बंद करावे? वाचा...

By admin | Updated: January 12, 2017 17:43 IST

नोटिफिकेशनद्वारे फेसबुक आपल्याला वेगवेगळी माहिती पुरवत असतं.हे नोटीफीकेशन्स काही वेळानंतर आपल्याला त्रासदायक वाटायला लागतात. त्यामुळे एकाग्रतेने कोणतंच काम नीट करता येत नाही.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - सोशल नेटवर्कसाठी जगप्रसिद्ध असलेलं फेसबुक सध्या बहुतांश लोकांच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. नोटिफिकेशनद्वारे फेसबुक आपल्याला वेगवेगळी माहिती पुरवत असतं.  वाढदिवस, लाइव्ह व्हिडीओ आदी नोटीफिकेशन फेसबुककडून वारंवार येत असतात.  
 
हे नोटीफीकेशन्स काही वेळानंतर आपल्याला त्रासदायक वाटायला लागतात. त्यामुळे आपला पुर्ण वेळ मोबाईल पाहण्यात जातो आणि एकाग्रतेने कोणतंच काम नीट करता येत नाही.  यापैकी काही नोटिफिकेशन्स आवश्यक असतात आणि काही फारसे गरजेचे नसतात. तर असे आपल्याला आवश्यक नसलेले नोटिफिकेशन्स बंद कसे करता येतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  
 
जर तुम्ही अॅन्ड्रॉईडवर फेसबुक अॅप वापरत असाल तर...
-अॅन्ड्रॉईडवर फेसबुक अॅप नोटिफिकेशनला डिसेबल करण्यासाठी या स्टेप फॉलो करा
-फेसबुक अॅप ओपन करा 
-सर्वात वरती तुम्हाला तीन आडव्या रेषांचा आयकॉन दिसेल त्यावर टॅप करा
-त्यानंतर अकाउंट सेटिंगमध्ये जा
-आता नोटिफिकेशनवर टॅप करा आणि जे नोटिफिेकेशऩ नको असतील ते डिसेबल करा 
 
जर तुम्ही iPhone किंवा iPad वर फेसबुक अॅप वापरत असाल तर....
-फेसबुक अॅप ओपन करा 
-उजव्या बाजुला खाली तुम्हाला 'मोअर' (MORE) बटनवर टॅप करा
-त्यानंतर सेटिंगवर टॅप करून अकाउंट सेटिंगमध्ये जा
-नोटिफिकेशनवर टॅप करा. याठिकाणी तुम्ही बर्थडे रिमाइंडर आणि लाइव्ह  व्हिडीओसारख्या नोटिफिकेशनच्या त्रासापासून  सुटका करून घेऊ शकता.   
 
 कंम्प्युटरवर फेसबुक नोटिफिकेशन डिसेबल करण्यासाठी 
-अॅप किंवा गेम्सच्या नोटिफिकेशनपासून सुटका करून घेण्यासाठी फेसबुक अॅप्लिकेशन सेटिंगमध्ये जा. 
-त्यानंतर गेम आणि अॅप नोटिफिकेशनमध्ये जा आणि एडिटवर क्लिक करा
-त्यानंतर नोटिफिकेशन टर्न ऑफवर क्लिक करा
 
जर कोणी सातत्याने तुम्हाला अॅप इन्विटेशन पाठवत असेल तर ब्लॉकिंग सेटिंग पेजवर जा आणि ब्लॉक अॅप इन्व्हाइटमध्ये त्याचं नाव टाइप करा. याशिवाय बर्थडे रिमाइंडर सारखे नोटिफिकेशन बंद करण्यासाठी फेसबुकच्या नोटिफिकेशन सेटिंग पेजवर जा.
बर्थडेजवळ असलेल्या बटनावर क्लिक करा आणि परत क्लिक ऑफ करा. याद्वारे फेसबुकवर मिळणारे बर्थडे नोटिफिकेशन डिसेबल होतील. यानंतरही तुम्हाला न्यूज फीड पेजवर बर्थडे रिमाइंडर दिसेल मात्र, यासाठी तुम्हाला कोणतंही नोटिफिकेशन येणार नाही.  सेटिंग पेजवर जाऊन तुम्ही  'अदर टाइप ऑफ नोटिफिकेशन' जवळ असलेल्या बटनावर क्लिक करून ते बंद करू शकतात. 
अशाप्रकारे तुम्ही फेसबुकवर त्रास देणारे सर्व नोटिफिकेशन बंद करू शकतात.